शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

धक्कादायक! साक्ष बदलण्यासाठी दोन्ही हात तोडले; शिंदेसेनेच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 06:04 IST

मारहाण करणाऱ्या व्यक्ती या शिंदे गटाचे पदाधिकारी असून या गुन्ह्याच्या नोंदीत फेरफार करण्यात आल्याचा आरोपही जखमीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : ‘माझ्या विरोधातील केसमधील साक्ष बदल; अन्यथा जिवे मारू’ असे म्हणत एकाला जबर मारहाण करून त्याचे दोन्ही हात तोडल्याप्रकरणी अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमानुष मारहाण करणाऱ्या व्यक्ती या शिंदे गटाचे पदाधिकारी असून या गुन्ह्याच्या नोंदीत फेरफार करण्यात आल्याचा आरोपही जखमीने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी माजी नगरसेवक लेनिन मुक्कू यांच्याकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात पिल्ले हे मुख्य साक्षीदार आहेत. या प्रकरणाची २० ऑगस्टला कोर्टात सुनावणी होती. या तारखेला पिल्ले यांनी जाऊ नये, यासाठी मुक्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी बहिणीकडून राखी बांधून परत येत असताना पिल्ले यांना वांद्रापाडा परिसरात गुड्डू नावाच्या तरुणाने थांबवले आणि तेथून चिंचपाडा परिसरातील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेले.

जबर मारहाण केलीविकास सोमेश्वर आणि मुक्कू यांच्यासह काही जणांनी त्यांना १५ ते २० मिनिटे जबर मारहाण केली. त्यानंतर अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेट परिसरातील मैदानात नेऊन तिथेही हातपाय बांधून तब्बल तासभर त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली. आणि मरणासन्न अवस्थेत तिथेच सोडून देत शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून पसार झाले, असा आरोप पिल्ले यांनी केला आहे.

उपचार सुरू पिल्ले यांच्यावर सध्या भिवपुरी इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून  तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात गुन्ह्याच्या नोंदीमध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप आता पिल्ले यांनी केला आहे. याबाबत अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

टॅग्स :ambernathअंबरनाथEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना