उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील जीन्स व्यापारी प्रकाश वांगा यांच्याकडून २१ नोव्हेंबर २०१८ ते १५ मार्च २०२२ दरम्यान सुरेश पंजाबी यांनी विकत घेतलेल्या जीन्स कपड्याचे ३२ लाख १९ हजार रुपये दिले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर, हिललाईन पोलीस तक्रार दिल्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात प्रकाश वांगा यांचे ए पी कॉर्पोरेशन नावाचे जीन्स कपड्याचे दुकान आहे. दुकानातून सुरेश पंजाबी यांनी सुरवातीला रोख स्वरूपात जीन्स कपडे घेऊन जात होते. २१ नोव्हेंबर २०१८ ते १५ मार्च २०२२ दरम्यान सुरेश पंजाबी यांनी ६० लाख ३५ हजार ९८२ रुपयांचा जीन्स कापड प्रकाश वांगा यांनी विकत घेतला. त्यापैकी पंजाबी यांनी २८ लाख १६ हजार ६७९ रुपये पैसे देऊन टाकले. मात्र उर्वरीत ३२ लाख १९ हजार ३०२ रुपये देण्यास टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचा संशय प्रकाश वांगा यांना आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठले.
प्रकाश वांगा यांच्या तक्रारींवर हिललाईन पोलिसांनी सुरेश पंजाबी यांच्या विरोधात ३२ लाखा १९ हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. शहरात असे प्रकार नेहमी घडत असून पोलीस सुरेश पंजाबी यांचा शोध घेत आहेत. जीन्स पॅन्ट चोरी, फसवणूक आदी प्रकारात वाढ झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.