कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २०१५ मध्ये परिसरातील २७ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांतील समस्या व प्रश्न येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी न सोडवल्यास तेथील नागरिक, मतदार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी सरकारदरबारी प्रलंबित आहे. हा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित केला गेला आहे. याप्रकरणी तीन याचिका न्यायप्रविष्ट आहेत. सरकारने स्वतंत्र पालिका स्थापन करण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. तसेच स्वतंत्र नगरपालिकेसाठी ७ सप्टेंबर २०१५ च्या अधिसूचनेची पूर्तता केलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी सरकारने एक हजार ८९ हेक्टर जागेवर एक हजार ८९ कोटी रुपये खर्च केले जातील, अशी घोषणा केली. मात्र, ग्रोथ सेंटरची एकही वीट रचलेली नाही. ग्रोथ सेंटर बाधितांसोबत सकारात्मक चर्चा केलेली नाही. त्यामुळे ग्रोथ सेंटरचा तिढा अद्याप कायम आहे. ग्रोथ सेंटरमध्ये बांधकाम परवानगी बिल्डरांना दिली जाते. मात्र, भूमिपुत्रांना परवानगी नाकारली जाते. २७ गावांमध्ये घरांच्या नोंदणीसंदर्भात सरकारचा कोणताही आदेश नसतानाही ती बंद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी निविदनात करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी २७ गावांतील प्रश्न सोडवावेत. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चाने दिला आहे.‘ते’ गुन्हे मागे घ्यानेवाळीतील शेतकºयांनी जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी आंदोलन केले. परंतु, पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही केली आहे.
२७ गावांचे प्रश्न न सोडवल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:48 AM