अंबरनाथ - वर्धा जिल्ह्यातील इंजिनियर असलेल्या तरुणीची तीच्याच प्रियकराने हत्या करुन स्वत: देखील आत्महत्या केली आहे. हा प्रकार अंबरनाथ कानसई गांव परिसरात घडला असून, या मुलीची हत्या दोन ते तीन दिवस आधीच केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हत्येनंतर प्रियकराने मुलीच्या नातेवाईकांना फोन करुन या घटनेची कल्पना दिल्यावर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरणी समोर आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील पिपरी मेघे येथे राहणारी तरुणी आचल महल्ले ही ठाण्यातील एका खाजगी कंपनीत इंजिनियर म्हणून कामाला होती. कामासाठी ठाण्यात आलेल्या आचल या तरुणीने दिव्यात भाडेतत्वावर एक घर घेतले. आचल आपल्या आई आणि भावासह दिव्यात राहत होती. तिचे कुटुंबीय दिवाळीनिमित्त गावी गेल्याने आचल दिव्यातील घरात एकटीच होती. याच दरम्यान दिचा प्रियकर नत्रम वर्मा हा अंबरनाथमध्ये कानसई गावात एक खोली भाडेतत्वावर घेऊन राहत होता. हे घर भडेतत्वावर घेतांना नेत्रमने ही मुलगी आपली प}ी असल्याचे भासविले होते. गेल्या महिन्याभरापासुन आचल हीचा वावर या घरात सुरु होता. आचलची आई गावी गेल्यावर आचलने दिव्यातील आपल्या शेजा-यांना रुग्णालयात जात असल्याचे सांगुन घराबाहेर पडली. मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. आचल ही प्रियकर नत्रम याच्यासोबत अंबरनाथच्या घरात होती. यावेळी नेत्रम याने तीचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर दोन दिवस त्याने तीला त्याचा घरात ठेवले. अखेर मृतदेहातुन दरुगधी पसरू लागल्यावर नेत्रम याने आचलच्या मोबाईलवरुन तीच्या मावशीचा नंबर काढुन त्यावर तीच्या मावशीला फोन केला. आचल ही आता या जगात राहिली नाही. तीची हत्या मी केली आहे. तीच्यासोबत मी देखील जात आहे असे सांगुन त्याने फोन कापला. तसेच त्याच नंबरवर त्याने तीच्या मावशीला मेसेज पाठवित अंबरनाथच्या घरचा पत्ता देखील पाठविला. मावशीला हा निरोप मिळताच आचलच्या नातेवाईकांनी दिव्यातील गाजेखान पठाण याला संपर्क साधत आचलचा शोध घेण्यास सांगितले. 24 ऑक्टोंबरला सकाळी पठाण यांनी कानसई गावात तो पत्ता शोधला. त्यानंतर पोलीसांच्या मदतीने घर उघडल्यावर आचल हीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तर नत्रमचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
* नेत्रम हा आचलच्या मागे लागुन तीला त्रस देत असल्याची तक्रार वर्धा जिल्ह्यात तीच्या पालकांनी दाखल केला होता. नेत्रम हा दोन ते तीन वर्षापासुन तीच्या मागे लागला होता असे तक्रारीत नमुद केले होते.
* नेत्रम याने आचलची हत्या का केली हा तपासाचा भाग असुन पोलीस या प्रकरणात मित्र परिवारांकडे चौकशी करित आहे. या दोघांमध्ये नेमके काय झाले याचा शोध घेणो पोलीसांना आव्हाणात्मक ठरत आहे.
*नेत्रम आणि आचल यांच्या प्रेमाला आचलच्या घरच्यांचा विरोध असल्याची दाट शक्यता आहे. तसेच नेत्रम हा अंबरनाथमध्ये राहण्यासाठी आल्याची खबर आचलच्या कुटुंबियांना नव्हती असे स्पष्ट दिसत आहे.
* नेत्रम आणि आचल हे वर्धाचेच रहिवासी असुन त्यांची जुनी ओळख आहे. त्यातुनच त्यांचे प्रेमसंबंधी निर्माण झाले होते.