...तर आ. कथोरे तोंडघशी पडणार नाहीत - रेवती गायकरपंकज पाटीलबदलापूर : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठे गैरव्यवहार झाले आहेत. शेतकºयांकडून वसुली करण्यासाठी, त्यांच्या जमिनी हडपण्यासाठी अधिकाºयांच्या कृपादृष्टीने या भागात दलालांच्या टोळ्या उभ्या झाल्या. या दलालांनी शेतकºयांना अडचणीत आणून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा वसूल केल्याचा आरोप समृद्धीबाधित शेतकरी संघटनेचे समन्वयक चंद्रकांत भोईर यांनी केला. आ. किसन कथोरे यांनीही या प्रक्रियेत अधिकाºयांनी मोठ्या प्रमाणात स्वत:चीच ‘समृद्धी’ करून घेतल्याचा आरोप केला होता. भोईर यांनी त्यांच्या आरोपाला पुष्टी दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना शेतकºयांना कोणत्या-ना-कोणत्या कारणाने कोंडीत पकडून त्यांच्याकडून पैसे लाटण्याचे काम करण्यात आले आहे. थेट पैसे लाटता येत नसल्याने अधिकाºयांनी ठेकेदारी पद्धतीवर काम करण्यासाठी नेमलेल्या कामगारांनाच दलाल म्हणून पुढे केले आहे. या दलालांच्या माध्यमातूनच शेतकºयांकडून पैसे लाटण्याचे काम केले जात असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. महामार्गाच्या कामात सुरुवातीला शेतकºयांना जो मोबदला दिला जात होता, त्याविरोधात संघर्ष उभा करण्याचे काम चंद्रकांत भोईर यांनी केले. त्यानंतर, शेतकºयांना समाधानकारक दर मिळाल्यावर शेतकºयांनी शेतजमिनी समृद्धी महामार्गासाठी दिल्या. प्रस्तावित आराखड्यानुसार भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले. अनेक शेतकºयांनी चांगला दर मिळत असल्याने शासनाकडून पैसे घेतले; मात्र शेतकºयांना कोट्यवधींचा मोबदला मिळत असल्याने त्यांचे सुख अधिकाºयांना पाहवत नव्हते. त्यामुळे भूसंपादनाच्या कामातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी दलालांची टोळी सक्रिय केली. या कामाचा आर्थिक लाभ मिळावा, यासाठी शेतकºयांच्या जागेमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या शेतकºयाला सहज पैसे मिळणे शक्य होते, त्या शेतकºयाच्या जमिनीवर हरकती घेण्यासाठी दलालांची मोठी फळी निर्माण केली. हे दलाल हरकती घेऊन शेतकºयांचे मंजूर झालेले पैसे रोखत होते. ही हरकत मागे घेण्यासाठी शेतकºयांकडून टक्केवारीच्या स्वरूपात पैसे लाटण्याचे काम दलालांनी केले. दलालांच्या या कामात अधिकारीदेखील अप्रत्यक्षपणे सहभागी होते. एवढेच नव्हे तर, ठेकेदारी पद्धतीवर काम करणारे कामगारदेखील दलाल पुढे करून अशा स्वरूपाचे काम करत आहेत. या प्रकरणात तक्रारी वाढल्यानंतर भूसंपादनाचे काम थांबवण्यात आले. तसेच पैसे देण्याचे कामही बंद करण्यात आले. मोबदला देण्याच्या कामात पारदर्शकता नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अनेक अधिकाºयांविरोधातही तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र या प्रकरणात आपण अडकणार, या भीतीने अनेक अधिकाºयांनी स्वत:च्या बदल्या करून घेतल्याचा दावा भोईर यांनी केला.
अधिकाºयांनी उभे केलेले दलाल एवढे शेफारले आहेत की, त्यातील काही दलालांनी मूळ शेतकºयाच्या नावावर असलेली जागा बनावट शेतकरी पुढे करून हडपण्याचे काम केले. ही हडपलेली जागा शासनाकडे समृद्धी मार्गासाठी देऊन परस्पर पैसे लाटल्याचेही अनेक प्रकार घडले आहेत. त्यातील महत्त्वाची तक्रार म्हणजे, विश्वास भोईर यांची. उशीदमधील या गरीब शेतकºयाची जागा समृद्धी महामार्गामध्ये जात होती; मात्र त्या शेतकºयाला अंधारात ठेवत त्याच्या नावावर दुसरा शेतकरी उभा करून ती जागा हडपण्याचे काम केले आहे. ही हडपलेली जागा समृद्धी महामार्गाला देऊन ते पैसे परस्पर लाटले. आपल्या शेतजमिनीचे पैसे घेतल्याचे आणि आपली जागाही शासनाकडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकºयांनी तक्रारी केल्या. असे अनेक प्रकार या परिसरात घडले आहेत. दलालांची मोठी टोळी या ठिकाणी उभी केली जात असल्याचा आरोप भोईर यांनी लोकमतशी बोलताना केला. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे पुराव्यासह तक्रारी केलेल्या आहेत. समृद्धीमध्ये काम करणाºया आणि या ठिकाणाहून बदली घेऊन गेलेल्या प्रत्येक अधिकाºयाची चौकशी झाली, तर ते अधिकारी किती समृद्ध झालेत, याची कल्पना येईल, असा आरोपही भोईर यांनी केला.ठाणे : आ. किसन कथोरे यांनी शासन निर्णय वाचला असता किंवा खरेदीची प्रक्रिया समजावून घेतली असती, तर बरे झाले असते. कुणावरही आरोप करताना, माहिती घेऊन व योग्य अभ्यास करून आरोप केल्यास तोंडावर पडण्याची वेळ येत नाही, असा लेखी सल्ला समृद्धी महामार्गाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आ. कथोरे यांना रविवारी दिला. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाला असून रेवती गायकर यांची चौकशी केल्यास त्यांच्याकडे १०० कोटी रुपये सापडतील, असा खळबळजनक आरोप आ. कथोरे यांनी शनिवारी नियोजन समितीच्या बैठकीत केला होता.
आ. कथोरे यांनी माझ्यामागे एवढा मोठा खोटा आरोप केला. समृद्धी महामार्गाला खूप विरोध झाला. त्याचा कहर म्हणजे आ. कथोरे यांनी केलेल्या आरोपांची बातमी होय, असे रेवती गायकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. समृद्धी महामार्गाची एकूणच प्रक्रियाही गायकर यांनी स्पष्ट केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी करताना एक अधिकारी कोणताच निर्णय घेत नाही. ही एक संघटित प्रक्रिया असून ती पारदर्शी पद्धतीने पूर्ण करण्यात आली. जमिनीच्या हिश्श्यात किंवा वाटपाबाबत किंवा मालकी हक्काबाबत वाद असतील, त्या ठिकाणी महसूल खात्यातील सक्षम अधिकाºयांनी योग्य निर्णय घेतले आहेत. जिल्हा समितीने मान्य करून दिलेल्या भूधारकाकडून व समितीने निश्चित करून दिलेल्या मूल्यांकनाप्रमाणे खरेदीखत नोंदवून ‘आरटीजीएस’द्वारे थेट भूधारकाच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा दावा गायकर यांनी केला.मौजे खर्डी तालुका शहापूर येथील शेतजमिनीचा हेक्टरी दर जिल्हा समितीने पाच कोटी ४७ लाख रुपये ठरवून दिला आहे. महावीर एंटरप्रायजेस या कंपनीतर्फेनिखिल अगरवाल यांच्या नावे ७/१२ सदरी असलेली ५.५० हेक्टर आर जमीन खरेदी केली. त्यासाठी कायदेशीर शोध अहवाल व जिल्हा समितीने मान्यता दिलेल्या मूल्यांकनानुसार जमीन खरेदी करून खातेदारास मोबदला अदा करण्यात आला. संबंधित जमीन ही कंपनीतर्फे औद्योगिक प्रायोजनासाठी खरेदी केली होती. औद्योगिक कारणासाठी जमीन खरेदी करताना शेतकरी दाखला असण्याची गरज नाही. मात्र, महामार्गासाठी ही जमीन खरेदी करताना या जमिनीस शेतजमिनीचा मोबदला अदा करण्यात आला; बिनशेतीचा नाही. कथोरे यांनी ही माहिती तपासून घेतली नाही, असे गायकर यांनी स्पष्ट केले. समितीने मान्य करून दिलेल्या भूधारकाकडून व निश्चित केलेल्या मूल्यांकनाप्रमाणे खरेदीची प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे दोन कोटींच्या जमिनीची सहा कोटींची खरेदी दाखवण्यात आली, हा कथोरे यांचा आरोप खोटा असल्याचे त्या म्हणाल्या. शेतकºयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप करणाºया कथोरे यांनी सर्व ८११ भूधारकांचे बँक खाते तपासून पाहावे. त्यांना योग्य तोच मोबदला मिळाला आहे किंवा नाही, याची शहानिशा करावी व नंतर आरोप करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. शासनाच्या कायदेशीर चौकटीत समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीपैकी ७८ टक्के जमिनीची खरेदी झाली. उर्वरित जमीन ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भूसंपादनाद्वारे घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भूसंपादनात बिनशेती जमिनीचाही समावेश आहे, जी खरेदी करण्यात आली नाही, असे रेवती गायकर यांनी सांगितले.‘समाजाला लागलेल्या किडीकडून अधिकाºयांवर खोटे आरोप’आ. कथोरे का खोटे आरोप करत आहेत, हे समजून येत नाही. त्यांना समज देण्याची खूप आवश्यकता आहे. अन्यथा, आम्ही अधिकारी १०० कोटी या पद्धतीने कमवतो, या विचाराने त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा टोला रेवती गायकर यांनी लगावला.हा प्रकल्प पूर्ण करताना चुकीचे व खोटे आरोप होत आहेत. तरीही, आम्ही अधिकारी तो पूर्णत्वाला नेत आहोत, कारण तो समाजहितोपयोगी आहे. कोणताही प्रकल्प हा कोण्या एका पक्षाचा नसतो. तो कोण्या एका व्यक्तीच्या फायद्याचाही नसतो.तो प्रकल्प आपल्या सर्वांचाच आहे, या भावनेतून अधिकारीवर्ग तो यशस्वी करतो. या प्रवासात अधिकाºयांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न स्वार्थी व समाजाला लागलेल्या किडीकडून केला जातो, अशा शब्दांत रेवती गायकर यांनी संताप व्यक्त केला.