ठाणे : थिनरने भरलेला टँकर सोडविण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने तीन लाखांची लाच स्वीकारणाºया दलाल हिंमत उर्फ हेमराज हिरजी नंदा याला ठाण्याचे न्या. आर. व्ही. ताम्हणेकर यांनी मंगळवारी सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली. तब्बल १९ वर्षांनंतर यातील कथित आरोपीला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे संदीप धरमशंकर सिंह यांनी २००३ मध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीचा थिनरने भरलेला टँकर सिल्व्हासा येथून गोवा येथे जात असताना त्या वाहनास ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अडवून ठेवला होता. हाच टँकर सोडविण्यासाठी तत्कालीन पोलीस पथकाने तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रार दाखल होताच ठाणे एसीबी पथकाने सापळा कारवाई करीत एका दलालाला लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली होती. हा दलाल टँकर सोडविण्यासाठी पोलिसांच्या वतीने लाच स्वीकारण्यासाठी आल्याचा आरोप होता. या गुन्ह्याचा खटला ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. न्यायालयाने साक्षी पुरावे यांना ग्राह्य मानून दलाल हिंमत उर्फ हेमराज हिरजी नंदा यास मंगळवारी दोषी ठरविले. त्याला सहा महिने सक्त मजूरीची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून म्हात्रे यांनी काम पाहिले.
तक्रारदाराने दाखविला होता एसीबीवरच अविश्वास
यातील तक्रारदाराने ठाणे एसीबीवरच अविश्वास दाखविला होता. मुंबईतील अधिकाºयांची या प्रकरणात चौकशीची नेमणूक करण्याचीही मागणी केली होती. त्याच मागणीवरुन महासंचालकांनी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त विलास तुपे, रमेश महाले आणि इतर अधिकाºयांची या सापळा कारवाईसाठी नेमणूक केली होती. ठाण्यातील आरटीओ कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये पैसे स्वीकारतांना दलाल हिंमत याला एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. याच केसचा तपास पुढे ठाणे एसीबीने केला होता.