- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापतींच्या गैरहजेरीत चक्क दिराने सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघड झाला. याप्रकाराने संतप्त प्रतिक्रिया उमटून बैठकीला उपस्थित प्रभाग अधिकाऱ्यांसह सभापतींच्या दिरावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती शुभांगी निकम यांनी प्रभाग समिती अधिकाऱ्याची आढावा बैठक दोन दिवसा पुर्वी बोलाविली होती. मात्र बैठकीला समिती सभापती वेळेत न आल्याने, सभापतींचे दिर व ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी चक्क सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांनची आढावा बैठक घेतली. बैठकीला प्रभाग अधिकारी भगवान कुमावत यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व विद्यमान नगरसेवक यांचे नातेवाईक उपस्थित असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत दिसत आहेत. सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत असलेल्या सभापतींच्या दिरावर तसेच ज्यांच्या समोर हा प्रकार घडला ते प्रभाग अधिकारी भगवान कुमावत यांच्यावर टीकेची एकच झोळ उठली. प्रभाग अधिकारी भगवान कुमावत यांच्या सोबत संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काही एक बोलण्यास नकार दिला. तर महापालिका मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांनी सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
महापालिका प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती शुभांगी निकम यांच्या सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्याची आढावा बैठक घेणारे सभापतीचे दिर व ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी सभापतींच्या खुर्चीत बसलो नोव्हतो. अशी प्रतिक्रिया दिली. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला सभापती शुभांगी निकम वेळेत न आल्याने प्रातिनिधिक स्वरूपात बैठक घेल्याची कबुली पत्रकारां जवळ बोलतांना निकम यांनी दिली. भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्याची आढावा बैठक घेणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी. अशी मागणी केल्याची माहिती दिली. याप्रकाराने महिला नागरसेविकांच्या कामकाजा बाबत शहरात चर्चा सुरू झाली. सभापती पदाचा अपमान करणार्यांवर कारवाई करून, ज्याच्या समोर हा प्रकार झाला. त्या प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
महिला नागरसेविकेचा कामकाजात लुडबुड?महापालिकेत ५० टक्के पेक्षा जास्त महिला नगरसेवक पदी निवडून आल्या असून महापौर पदी लिलाबाई अशानं आहेत. महिला नगरसेविकाना शहर विकासाचे काम करू देण्यास पूर्ण स्वतंत्र देने गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात तसे आशादायी चित्र शहरात नाही. महिला नागरसेविकेंचे नातेवाईकच त्यांच्या कामात लुडबुड करीत असून यातूनच सभापतींच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्याचा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे..