नालासोपारा (मंगेश कराळे) :- गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी नालासोपाऱ्यात १ लाख ८० हजारांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री व तस्करी करणाऱ्या आरोपी विरुध्द कडक कारवाई करुन पायबंद करण्यासाठी वरिष्ठांकडुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बातमीदाराच्या मार्फतीने बातमी मिळवुन रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास हनुमान नगरच्या मैत्री अपार्टमेंटजवळील रोडवर आरोपी कुतबुद्दीन मुस्तफा काचवाला (३०) याच्या कब्जात १८ ग्रॅम वजनाचा १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर या अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी विरुध्द नालासोपारा पोलीस ठाण्यात एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास नालासोपारा पोलीस करत आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म.सु.ब. प्रविण वानखेडे यांनी केली आहे.