ठाणे : ठाणे महानगरपालिका लवकरच कळवा येथे बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार आहे. ५४ हजार ४७० चौरस फूट जागेवर याकरिता स्वतंत्र इमारत बांधली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असलेल्या बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येणार आहे. २०२०-२१ हे जनरल नर्सिंग मिडवायफरी प्रशिक्षणाचे शेवटचे वर्ष आहे. या अभ्यासक्र माऐवजी आता बीएससी नर्सिंग अभ्यासक्र म पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. याबाबतचा प्रस्तावास येत्या महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालय उभारणीच्या कामाला सुरु वात होणार आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयामध्ये सुरु वातीला ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. बीएससी नर्सिंगची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहा महिने इंटर्नशिप करावी लागणार असून त्यांना सात हजार रु पये एवढे वेतन दिले जाणार आहे. महाविद्यालयासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ ५४ हजार ४७० चौरस फूट एवढ्या जागेवर स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात प्राथमिक रक्कम म्हणून २५ लाख रु पयांची तरतूद केली आहे.५० जणांची प्रवेश क्षमताच्महानगरपालिकेचे कळवा येथे स्वत:चे सुसज्ज रु ग्णालय असल्याने नव्याने सुरू होत असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण पूर्ण करणाºया नर्सेसना या रु ग्णालयात इंटर्नशिप करणे शक्य होणार आहे. नव्या इमारतीत लेक्चर हॉल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वतंत्र मैदान, हॉस्टेल, भोजन कक्ष आदी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.च्२०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सदर महाविद्यालयामध्ये ५० विद्यार्र्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे. येथे प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षणही दिले जाणार असून महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयालादेखील त्याचा फायदा होईल.जीएनएम पदवी होणार हद्दपार : सध्या ठाण्यात महापालिकेच्या वतीने सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था कार्यरत असून आतापर्यंत ५६९ जणींना नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उत्तीर्ण विद्यार्थिनींना पदविका परिचर्या (जीएनएम) ही पदवी दिली जाते. मात्र, हा अभ्यासक्र म आता लवकरच बंद होणार असून त्याऐवजी चार वर्षांचा स्वतंत्र बीएससी नर्सिंग अभ्यासक्र म सुरू होत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व भारतीय नर्सिंग परिषदेने निश्चित केलेला अत्याधुनिक अभ्यासक्र म बीएससी नर्सिंग महाविद्यालयामध्ये शिकवला जाणार आहे.