बीएसपीचे प्रदेश प्रभारी प्रशांत इंगळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश
By सदानंद नाईक | Published: December 2, 2024 04:21 PM2024-12-02T16:21:25+5:302024-12-02T16:21:33+5:30
राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जून खरगे यांच्या हस्ते प्रवेश
सदानंद नाईक/ उल्हासनगर : बहुजन समाज पक्षांचे प्रदेश प्रभारी व महासचिव प्रशांत इंगळे त्यांचा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जून खरगे, खासदार मुकुल वासनिक, इमरान प्रतापगडी यांच्या उपस्थित झाला. सोमवारी काँग्रेसीचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थिती पत्रकार घेऊन प्रवेशची माहिती पत्रकार यांना दिली.
उल्हासनगर शांतीप्रकाश हॉल मध्ये काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन प्रशांत इंगळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती दिली. प्रशांत इंगळे हे बीएसपी पक्षाचे प्रदेश प्रभारी व महासचिव पदी होते. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जून खरगे यांच्या उपस्थित प्रशांत इंगळे यांचा प्रवेश झाला.
यावेळी पक्षाचे खासदार मुकुल वासनिक, खासदार इमरान प्रतापगडी आदिजन उपस्थित होते. इंगळे यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढून त्यांचा राज्यात पा पक्षाला उपयोग होईल. असे यावेळी रोहित साळवे म्हणाले. यावेळी पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष किशोर. धडके, विशाल सोनावणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.