शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अर्थसंकल्प: ठाणेकरांना घेता येणार डबल डेकर बसमधून फिरण्याचा आनंद; इलेक्ट्रिक बस वाढणार

By अजित मांडके | Published: February 08, 2024 4:10 PM

ठाणे महापालिकेचा (TMT) ६९४ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर, तिकीट भाडेवाढ नाही

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे परिवहन सेवेचा आर्थिक डोलारा सुधरावण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखत नव्या इलेक्ट्रीक बस जास्तीत जास्त संख्येने घेणे, कर्मचाऱ्यांची थकीत देणी देणे आदींसह नव्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचे ठाणे परिवहन सेवेने प्रस्तावित केले आहे. गुरुवारी ठाणे परिवहन सेवेचा ६९४ कोटींचा काटकसरीचा आणि वास्तववादी अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहन समितीला सादर केला. तर यंदाही कोणत्याही प्रकारची तिकीट दरात भाडेवाढ प्रस्तावित करण्यात येणार नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी सादर करण्यात आलेल्या परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बसचा समावेश करण्यात आला होता. ठाणे परिवहन सेवेचा २०२३ - २४ चा ४२७ कोटी १९ लाखाचा  सुधारित आणि २०२४-२५ चा ६९४ कोटींचा मुळ अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात परिवहन सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व निवृत्तीधारकांचे पेन्शन, थकबाकी व इतर देणी याकरिता तरतूद करण्यात येणार अली आहे.  ठाणे परिवहन सेवेने २०१५ नंतर अद्याप नव्याने भाडेवाढ केलेली नाही. यंदा देखील कोणत्याही स्वरुपाची तिकीट  भाडेवाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या १२३ इलेक्ट्रिक बस पैकी साधारण ११४ बस परिवहनच्या ताफयात दाखल झाल्या आहेत. उरलेल्या बस देखील लवकरच दाखल होणार आहेत. याचजोडीला आणखीन सुमारे १३० च्या आसपास इलेक्ट्रिक बस ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल करण्याच्या दुष्टीने या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.  नव्याने दाखल होणाºया बस नव नवीन मार्गांवर चालवून त्यातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ठाण्यातही आता डबल डेकर बस सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका