कल्याण : मलंगगड व परिसराचा विकास सरकारने तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत करावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार, या परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना बुधवारी दिले.गडावर भाविकांच्या सोयीसाठी खा. शिंदे यांच्या निधीतून बांधलेल्या पायºयांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी मलंग यात्रेच्या निमित्ताने करण्यात आले. तसेच ‘नाबार्ड’च्या निधीतून गडाच्या पायथ्याशी बांधलेला साकव व आॅस्ट्रेलियन तंत्रज्ञान वापरून बांधलेल्या पाण्याच्या टाकीचेही उद्घाटन या वेळी झाले.२२ कोटींची कामे मंजूर-खासदार निधीतून मलंगगड परिसरातील रस्ते, शाळा दुरुस्ती, प्रसाधनगृहे, रेनवॉटर हार्वेस्टिंगची जवळपास २२ कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर केली आहेत. यापैकी ६० टक्के काम प्रगतीपथावर आहे.- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चिंचवली करवले ते नाºहेण, नाºहेण ते राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. खरड ते मलंगगडापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. गडाच्या मुख्य रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली.न्यायालयातही जिंकणार लढा - एकनाथ शिंदेकल्याण : मलंगगडावर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. त्यावर मुस्लिमही हक्क सांगत आहेत. परंतु, मलंगगड ही हिंदूंची वहिवाट आहे. मलंगमुक्तीची पहाट हीच खरी हिंदूंची वहिवाट आहे. मलंगमुक्तीचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी कल्याण जिल्हा दिवाणी न्यायालय ते उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मलंगमुक्तीचे आंदोलन हे कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर ही सत्य आणि असत्याची लढाई आहे. न्यायालयातही आम्ही मलंगमुक्तीचा लढा जिंकू, असा ठाम विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला.दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले मलंगमुक्तीचे आंदोलन आजही सुरू आहे. शिवसेनेतर्फे न्यायालयातही लढा सुरू आहे. राज्यात सत्ता शिवसेना-भाजपाची असली, तरी न्यायालयीन लढा जिंकूनच हिंदूंच्या देवस्थानावर हक्क सांगितला जाणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.दरम्यान, हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी बुधवारी मलंगगडाच्या दिशेने कूच केले. गडाच्या पायथ्याशीच वाहने एक किलोमीटर आधीच अडवली जात होती. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. पहाटेच भक्तांनी मच्छिंद्रनाथांची पालखी गडावर नेली. गडावर व गडाच्या पायथ्याशी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते मच्छिंद्रनाथांच्या समाधीची विधिवत पूजा झाली.यावेळी खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, रूपेश म्हात्रे, रवींद्र फाटक, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, अंबरनाथ नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सभागृह नेते राजेश मोरे, रमेश जाधव, रमेश म्हात्रे, महानगरप्रमुख विजय साळवी, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, दीपेश म्हात्रे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, जिल्हा महिला संघटक विजया पोटे, दिनेश देशमुख, रामचंद्र बेलवडे, भाईनाथ महाराज, रवी पाटील, सचिन बासरे, अरविंद मोरे, अशोक म्हात्रे तसेच शिवसैनिकांसह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदूत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
मलंगगडाचा विकास आराखडा तयार करा, पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:16 AM