शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

महात्मा जोतिबा फुले रस्त्याला बिल्डरचे नाव

By admin | Published: April 10, 2016 1:19 AM

महिलांना शिक्षणाची दारे खुली करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती सोमवारी साजरी होणार आहे. भाईंदर पूर्वेतील फुले यांच्या नावाने १५ वर्षांपासून

मीरा रोड : महिलांना शिक्षणाची दारे खुली करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती सोमवारी साजरी होणार आहे. भाईंदर पूर्वेतील फुले यांच्या नावाने १५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मार्गाचे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका मेघना दीपक रावल यांनी पालिका प्रशासनाला हाताशी धरून पुन्हा नामकरण केले. या रस्त्याला त्यांनी त्यांच्या सासऱ्यांचे नाव दिल्याने शहरात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याचा निषेध म्हणून मनसे व रिपब्लिकन पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.पूर्वेतील महात्मा फुले मार्ग (केबिन मार्ग) परिसरातील प्रभाग १७ ‘ब’च्या भाजपा नगरसेविका रावल यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवारी सदर जागृती अपार्टमेंट ते फाटक पर्यंतच्या रस्त्याचे नामकरण स्वर्गीय चंदूभाई रावल असे केले. या वेळी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी भाजपा नगरसेविका डिंपल मेहता, नगरसेविका कल्पना म्हात्रे, भगवतीबेन रावल आदी उपस्थित होते. तर कार्यक्र माच्या ठिकाणी असलेल्या आधीच्या नामफलकावरील फुले यांच्या नावाला चुना फासल्याचा आरोप होत आहे.वास्तविक तत्कालीन नगरपरिषद काळात आॅक्टोबर २००१ मध्ये स्थायी समितीने शहरातील रस्ते व चौक यांचे नामकरण करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार भार्इंदर पूर्वेतील रेल्वेस्थानकाला समांतर असलेल्या जागृती इमारत ते फाटक पर्यंतच्या रस्त्याला फुले यांचे नाव देण्यात आले होते. आजही पालिकेच्या या मार्गावरील नामफलकावर फुले यांचेच नाव आहे. असे असताना नगरसेविका रावल यांनी या रस्त्याला चक्क स्वत:चे सासरे व बिल्डर कै. चंदूभाई रावल यांचे नाव देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, भाजपा व पालिका प्रशासनानेही फुले यांचे नाव बदलण्याचा निर्णय घेत रावल यांच्या नावाला मंजुरी दिली.याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित म्हणाले, की मागील वर्षी महासभेत नामकरणाचा ठराव झाला होता. त्या नुसार फुले यांचे नाव बदलून चंदूभाई रावल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आधी दिलेली नावे बदलू नये, असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे महासभेत महापौरांच्या मान्यतेने मंजूर झालेल्या ठरावांचे पालन केले आहे.मी माझे सासरे चंदूभाई रावल यांचे नाव या रस्त्याला देण्याची मागणी केली होती. नोव्हेंबर २०१५ च्या महासभेत त्याला मंजुरी मिळाली होती. प्रशासनाने नामकरणाचे पत्र दिले आहे. त्यानुसार नामकरण सोहळा झाला, असे नगरसेविका रावल म्हणाल्या. मी कार्यक्रमात आहे. नंतर फोन करा, असे त्यांनी सांगितले. मात्र नंतर त्यांना फोन करूनही त्यांनी फोन उचलला नाही.पोलिसांकडे तक्रारी : रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस मंगेश होनमुखे यांनी या विरोधात पोलिसांकडे तक्र ारी केल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी आयुक्तांकडे तक्र ार करणार आहोत. नगरसेविका रावल यांच्या घरासमोर व पालिका मुख्यालयात निदर्शने करणार असल्याचे ते म्हणाले. आमदार मेहता व महापौर गीता जैन यांच्या इच्छेशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. त्यांचाही या प्रकाराला आशीर्वाद आहे, असा आरोप होनमुखे यांनी केला. महापुरुषांची नावे पुसण्याचा घाटथोर महापुरु षांची नावे पुसण्याचा घाट भाजपा व पालिका प्रशासनाने घातला आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेश उपाध्यक्ष अरु ण कदम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून तीव्र आंदोलन करणार आहोत. भाजपाची समाजसुधारकांचा अवमान केला करण्याची हिंमत झालीच कशी? भाजपा, पालिका प्रशासन व नगरसेविकेने जाहीर माफी मागावी. बेकायदा बांधकामात सहभाग असणाऱ्या बिल्डरचे रस्त्याला दिलेले नाव त्वरित बदलावे, अशी मागणी मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सुलतान पटेल यांनी केली आहे .