शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

रहिवाशांच्या नावाखाली बिल्डरांना पायघड्या; २५ मीटर रस्त्याचे आरक्षण बदलले, नगरविकास खात्याची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:23 AM

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनलगत असलेल्या महामार्गावर पोहोचण्यासाठी रस्ता नसलेल्या वसाहतींकरिता विकास आराखड्यातील रस्त्यांचे आरक्षण बदलण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला नगरविकास खात्याने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनलगत असलेल्या महामार्गावर पोहोचण्यासाठी रस्ता नसलेल्या वसाहतींकरिता विकास आराखड्यातील रस्त्यांचे आरक्षण बदलण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला नगरविकास खात्याने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या महामार्गावरील मुंबई विद्यापीठाला दिलेल्या जागेपासून थेट कशेळीनाक्यापर्यंतच्या विकासकांची चांदी होणार आहे. आरक्षण बदलल्याने पाइपलाइनच्या दुसऱ्या बाजूस समांतर असा १५ मीटर रस्ता करणे आता ठाणे महापालिकेस शक्य होणार आहे. या रस्त्यामुळे या वसाहती थेट मुंबई-आग्रा महामार्गास जोडल्या जाणार आहेत.ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मुंबई-आग्रा महामार्गालगत मुंबई विद्यापीठाला दिलेल्या भूखंडापासून भिवंडीकडे येजा करण्यासाठी २५ मीटरचा रस्ता आहे. परंतु, तो मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनवरून जातो. त्यामुळे पाइपलाइनवरील त्याचा भाग नियमानुसार रद्द केल्यामुळे सध्या हा परिसर भिवंडी रोडला कनेक्ट होत नाही. महामार्गावरून या भागात जायचे झाल्यास भिवंडीनजीकच्या कशेळीनाक्यापर्यंत जाऊन पुन्हा मागे यावे लागते. यामुळे या भागातील रहिवाशांची मोठी अडचण होत आहे.सध्या या भागात म्हाडा वसाहतीसह प्रस्तावित परवडणाºया घरांचा प्रकल्प, वर्धमान गार्डन वसाहत, आरएनए बिल्डरसह पिरामल समूहाची ३२ एकरवरील टाउनशिप उभी राहत आहे. तेथे येजा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे या भागातील बिल्डरांच्या सदनिकांना बाजारात उठाव नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. रहिवाशांसोबतच या परिसरातील बिल्डरांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेच्या पाइपलाइनवरील २५ रस्त्यांचे आरक्षण बदलून त्याचा रहिवासी क्षेत्रात समावेश करीत दुसºया बाजूस समांंतर असा १५ मीटरचा रस्ता करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यास महासभेसह २१ आॅगस्ट २००४ च्या शासननिर्णयानुसार एमआरटीपी अ‍ॅक्टच्या कलम ३७ (१) नुसार नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्यास मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रही घेतले होते. या प्रस्तावास नगरविकास खात्याने मंजुरी दिली. या निर्णयामुळे या परिसरातील रहिवाशांची मोठी अडचण दूर होण्यास मदत होणार आहे, हेदेखील तेवढेच खरे. रस्त्याचे काम झाल्यानंतर या वसाहती थेट महामार्गाशी जुळणार आहेत.रहिवाशांची अडचण होणार दूरम्हाडा कॉलनी व परिसर आणि मुंबई विद्यापीठासह बाळकुम भागातील वसाहतींना थेट मुंबई-आग्रा महामार्गास कनेक्ट करणे आता सोपे होणार असल्याचे शहर विकास विभागातील एका अधिकाºयाने या वृत्तास दुजोरा देताना सांगितले. यामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी अडचण दूर होणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका