शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

खोदकामामुळे इमारत झाली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 3:20 AM

मीरा रोडची घटना : संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला

मीरा रोड : मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्कभागात एका बिल्डरने बांधकामाचा पाया खोदण्यासाठी ५० फूट खोल खोदकाम केल्याने जवळच्या एनजी विकास सोसायटीची संरक्षक भिंत पडून रस्ता खचल्याची घटना मंगळवारी घडली. शहरात सातत्याने असे प्रकार घडत असताना महापालिका मात्र डोळेझाक करत असल्याने राहिवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

एन.जी. विकास इमारतीच्या बाजूला सध्या बांधकाम प्रकल्पासाठी पाया बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी न घेताच सुमारे ५० फूट खोल खोदकाम सुरू केले आहे. खोदकामावेळी मोठ्या प्रमाणात माती खणल्याने मंगळवारी आवाज होऊन एन.जी. विकास इमारतीची कुंपणभिंत खचून कोसळली. इतकेच नव्हे तर इमारतीच्या आतील रस्ता व मोकळी जागाही खचून मोठ्या भेगा पडल्या आहेत. इमारतीची कुंपणभिंत खचून पडल्याने व मोठ्या भेगा गेल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. ही इमारत २००७ मध्ये बांधली असून जेमतेम ११ वर्षेच झाली आहेत. इमारतीला दोन विंग असून ६४ सदनिका आहेत. इमारतीत मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात.

इमारतीसमोर सुरू झालेल्या दिवसरात्र खोदकामामुळे प्रचंड आवाज होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण यांनासुद्धा आवाजाचा प्रचंड त्रास होत आहे. रहिवाशांनी तक्र ारी करूनही कुणी दाद देत नसून बिल्डरची तळी उचलून धरत आहेत. कुंपण कोसळून तडे गेल्याचे रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक संजय थेराडे, शिक्षण समिती उपसभापती अनिता मुखर्जी आदींना पाचारण केले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. कुठलीही खबरदारी घेतली नसताना बिल्डरला परवानगी दिली कशी? त्याच्यावर कारवाई का केली नाही? मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत बसणार का? असे अनेक सवाल करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. याआधी रामदेव पार्कजवळ खोदकाम सुरू असताना गटार व रस्ता खचून गेला होता. विनयनगरमध्येही बिल्डरच्या खोदकामावेळी जवळच्या इमारतीची कुंपणभिंत कोसळून लाद्या उखडल्या होत्या.हाटकेश भागातही अशीच घटनाहाटकेश भागातील ग्रीन वूड या संकुलातील इमारतींना खोदकामामुळे तडे गेले व इमारत खचल्याने रहिवाशांना बाहेर काढावे लागले होते. याच प्रकल्पामुळे ओम महावीर आर्केड या सात मजली इमारतीला हादरे बसून तडे गेल्याची तक्र ार रहिवाशांनी केली होती. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे