ठाणे - पालिका हद्दीत बेकायदा बांधकामे आजही सुरू आहेत. पालिका काही ठिकाणी कारवाई करते, तर काही ठिकाणी डोळेझाक करते. मागील वर्षभरात अशा बांधकामांविरोधात पालिकेकडे दोन हजार ४०० हून अधिक तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेने २८० बांधकामांवर कारवाई केली असून, बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ६८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भूमाफिया पुन्हा सक्रिय कोरोना काळात भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारण्यास सुरुवात केली होती. या बांधकामांच्या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर कारवाई केली होती. दोन वर्षांपूर्वी कारवाई थंडावताच भूमाफिया पुन्हा सक्रिय झाले.
पालिकेवर टीका ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागांत बेकायदा इमारती उभ्या राहू लागल्या. त्यावरून पालिकेवर टीका होऊ लागली होती. यानंतर पालिकेने बेकायदा इमारतींची यादी तयार करत पोलिस बंदोबस्तात त्या तोडण्याची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई थांबल्यानंतर आता पुन्हा बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. लोकमान्यनगर भागात बेकायदा इमारत तोडण्यात आली.