लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बुलेट ट्रेनला असलेला राजकीय पक्षांचा विरोध काहीसा मावळलेला असल्याचेच दिसत होते. यापूर्वी ठाण्यातून जाणाऱ्या शीळ येथील मार्गाला विरोध झाला होता. परंतु, ठाणे महापालिकेने आपल्या नावे असलेल्या येथील भूखंडापैकी ०.३८.४९ हे. आर. एवढे क्षेत्र नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि.ला हस्तांतरित करण्याचे निश्चित केले आहे.
या बदल्यात महापालिकेला सहा कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मिळणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत मंजूर केला होता. परंतु, राष्ट्रवादीच्या हरकतीनंतर महापौरांनी त्याला स्थगिती दिली. यामुळे बुलेट ट्रेनचा मार्ग आणखी लांबणीवर पडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे भाजप प्रस्ताव मंजुरीचा आग्रह धरेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात नगरसेवकांनी मौन बाळगले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि.च्या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणारी खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेण्यासाठी ठामपा क्षेत्रातील गावापैकी शीळ येथील जमीन ९ कोटी प्रति हेक्टर या निश्चित केलेल्या दरानुसार या भूखंडाचे अंतिम मूल्य ६ कोटी ९२ लाख ८२ हजार असे अंतिम करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीने घेतली होती हरकतया भागातून ४०.०० मीटर विकास आराखड्यातील रस्ता असून त्यावर कल्याण रोड ते एमआयडीसी रोड उड्डाणपुलाच्या बांधकामास एनएचएसआरसीएल यांनी यापूर्वीच एमएमआरडीएला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा भूखंड एनएचएसआरसीएलला हस्तांतरित करण्यास एमएमआरडीएची हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार या भूखंडाच्या मोबदल्यापोटी मिळणाºया सहा कोटी ९२ लाख ८२ हजारांची रक्कम महापालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. तो चर्चेला येताच राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या प्रस्तावाबाबत मत मांडण्यास सुरु वात केली. परंतु, हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट करताच राष्टÑवादीने त्याला समर्थन दिले.