शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

बुलेट ट्रेनच्या खर्चाची कोटींची उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:14 AM

गेल्या तीन वर्षांत एक लाख १० हजार कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च आठ ते दहा टक्के अर्थात आठ ते दहा हजार कोटींनी वाढल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.

नारायण जाधव ठाणे : आधीच पर्यावरणप्रेमींच्या विरोधासह भूसंपादनातील अडथळ्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प तीन वर्षांपासून रखडत चाललेला असताना आता त्यापुढे कोविडचे जागतिक संकट उभे राहिले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत एक लाख १० हजार कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च आठ ते दहा टक्के अर्थात आठ ते दहा हजार कोटींनी वाढल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ग्लोबल समिटमध्येही रेल्वेमंत्र्यांसह बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे मान्य करून याबाबत त्यास अर्थसाहाय्य करणाºया ‘जायका’ कॉर्पोरेशनसोबत कोणत्याही नव्या वाटाघाटी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.>यामुळे वाढला खर्चजागांचे वाढलेले भाव, जपानी येन व रुपयाच्या विनिमयदरात वाढलेला फरक, सिमेंट, स्टीलसह इतर कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि कोविडमुळे मनुष्यबळाची निर्माण होणारी कमतरता, कराव्या लागणाºया आरोग्यविषयक उपाययोजना, या कारणांमुळे हा खर्च वाढला आहे. यामुळे एप्रिल २०२० मध्ये बांधकामास सुरुवात होऊन तो डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे स्वप्न लांबणीवर पडणार आहे.>हे आहेत अडथळे : सुमारे ५०८ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. मात्र, यासाठी लागणाºया १४३४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन हा महत्त्वाचा अडथळा ठरला आहे. याशिवाय, बुलेटट्रेन ठाणे खाडीखालून जाणार असून राज्यातील एकमेव फलेमिंगो अभयारण्यासह पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर अभयारण्यास क्षती पोहोचणार असल्याने पर्यावरणप्रेमींचा तीस विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिलेले असतानाच आता कोविडचे जागतिक संकट उभे राहिल्याने प्रकल्प लांबणीवर पडून त्याचा खर्च वाढत चालला आहे.>बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच एकूण खर्चाबाबत बोलणे, हे अधिक उचित ठरेल. आता त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तसेच एकूण कर्ज आणि त्याच्या मुख्य अटी व शर्तींबाबत ‘जायका’सोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यात येणार नाहीत. कोरोना महामारीमुळे या प्रकल्पावर काम करणाºया मनुष्यबळावर काय परिणाम झाला हे सांगणे वा त्यांच्या उपलब्धतेबाबत अंदाज वर्तविणे आता कठीण असून सध्या चालू असलेली कामे मात्र नियमित सुरू आहेत.- सुषमा गौर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, कॉर्पोरेट कम्युनिकेशन,नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन