ठाणे : बुलेट ट्रेनच्या जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव तब्बल चार वेळा फेटाळून लावत दप्तरी दाखल केल्यानंतरही बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा हा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला. परंतु यावर चर्चा न करताच हा प्रस्ताव अगदी काही क्षणात मंजुर करण्यात आल्याचे दिसून आले. शिवसेनेने या प्रस्तावाच्या विरोधात असलेली आपली भूमिका अचानक मवाळ केल्याचे आश्चर्यदेखील वाटत आहे. परंतु केवळ शेतकऱ्यांना आणि इतरांना मोबदला मिळाला असल्याने पालिकेचे नुकसान कशासाठी असे सांगत शिवसेनेकडून हा प्रस्ताव मंजुर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मुंबई कारशेडच्या जागेवरून राज्य आणि केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी तणाव वाढला होता. त्यामुळे ठाण्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडून केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला जागा हस्तांतरण करण्यास विरोध होणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे ते खरेही झाले. चार वेळा बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तरांतरणाचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी आणूनही तो फेटाळून ते दफ्तरी दाखल करण्यात आला होता. चार वेळा बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तरांतरणाचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी आणूनही तो फेटाळून दफ्तरी दाखल करण्यात आला होता. बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे संकेत यापूर्वीच ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. शिवसेनेकडून जागा हस्तांतरण प्रस्तावाला विरोध केल्याने शेतकऱ्यांकडूनही शिवसेनेकडे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच बहुतांश जागेचे अधिग्रहण करण्यात आले असल्याने शिवसेना पक्ष देखील हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अनुकूल असल्याचे चित्न यापूर्वीच निर्माण झाले होते. बुधवारी हा प्रस्ताव जेव्हा मंजुरीसाठी आला तेव्हा या प्रस्तावावर शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा चर्चा न करताच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प ओळखला जातो. ठाणे महापालिका क्षेत्रतील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रि या गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणार्या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर ९ कोटी रु पये मोबादला दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पात महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३,८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने गेल्यावर्षी केली होती. तसेच या जागेच्या बद्दल्यात ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रु पये मोबदला देण्याची तयारी दाखिवली होती. त्यानुसार मोबदला घेऊन ही जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वर्षभरापूर्वी तयार केला होता. त्यानुसार बुधवारी झालेल्या महासभेत चर्चेविना शिवसेना आणि भाजपने या प्रस्तावाला सहमती दर्शविली.
मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर झाल्या होत्या हालचाली कारशेडच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकार मधील संबंध ताणले गेले होते. त्यामुळेच केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनला जागा हस्तांतरण करण्यास ठाणे महापालिकेच्या सत्ताधा:यांकडून विरोध करण्यात येऊन हा प्रकल्प दफ्तरी दाखल करण्यात आला होता. मात्न राज्य स्तरावरच नेत्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ठाण्यातील सत्ताधा:यांकडून देखील या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची चिन्हे यापूर्वीच निर्माण झाली होती, आणि अपेक्षेप्रमाणे अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.