आजपर्यंत कधीही न दिसलेले म्हातार्डी गाव हे बुलेट ट्रेनच्यानिमित्ताने नकाशावर झळकणार आहे. जिल्ह्यात ठाण्यानंतर दुसरे स्थानक म्हातार्डी येथे होणार आहे, असे काही जण सांगतात. १५० घरांचे आणि ५०० लोकसंख्या असलेले हे गाव आहे. येथील नागरिकांचे उपजीविकेचे साधन हे भातशेती आणि मत्स्यशेती तसेच भाजीपाला हे आहे. या खेडेगावातील जागा ही आर झोनमधील आहे. जी काही जमीन आहे ती जवळपास ४० हेक्टर इतकी आहे. तर प्रत्येक शेतकºयाच्या वाट्याला साधारणत: एक ते दोन एकर जागा येत असल्याचे तेथील शेतकºयांचे म्हणणे आहे. तसेच गावातील जागा अद्यापही कुणाला विकली गेलेली नाही. मात्र काही जणांनी जागा विकासकाला विकसित करण्यासाठी दिलेली आहे. पण ती विकलेली नाही.म्हातार्डी हे दिवा रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. म्हातार्डी येथे आगासन आणि दातीवली येथूनही जाता येते. तसेच या गावापासून दहा मिनिटांच्या अंतरावर दातिवली हे रेल्वे स्थानक आहे. मात्र ते असून नसल्यासारखेच आहे. हे स्थानक कोकण रेल्वे मार्गावर असल्याने कोकणात जाणाºया दोन पॅसेंजर येथे थांबतात. त्यामुळे येथील नागरिक शक्यतो दिवा ते म्हातार्डी गावादरम्यान रेल्वेमार्गावरून पायी ये-जा करतात. कुठलाच रस्ता जोडलेले नसणे, ही येथील ग्रामस्थांची ही सर्वात मोठी समस्या आहे.आगासन हे गावही खेडेगावाप्रमाणे आहे. आगासन ते म्हातार्डी गावाच्या मधोमध दातिवली रेल्वे स्थानक आहे. म्हातार्डीप्रमाणेच आगासनची परिस्थिती आहे. म्हातार्डीपेक्षा आगासन गावातील अधिक शेतकरी बाधित होणार आहेत. येथे म्हातार्डीप्रमाणेच समस्या आहेत. तेथील ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन मासेमारी आणि भातशेती हेच साधन आहे. आगासनमधील शेतकरी बुलेट ट्रेनमुळे नाही, तर ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यामुळे भरडले जाणार आहेत. सुविधा देण्याबाबत उपेक्षा करणाºया महापालिकेने येथील १३ हेक्टर जागेवर आरक्षण टाकले आहे.शेतकºयांना कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण सुरू केल्यावर त्याला विरोध दर्शवला. शेतकºयांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आगासन गाव बचाव संघर्ष समितीची स्थापना केली. त्यानंतर प्रशासन आणि शेतकºयांची बैठक झाली. तसेच जोपर्यंत बाधित शेतकºयांना योग्य तो मोबदला जाहीर होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण होऊ देणार नाही. तसेच मोबदला जाहीर करताना तो लेखी स्वरुपात मिळावा. अन्यथा विरोध कायम राहील.- रोहिदास मुंडे, अघ्यक्ष,आगासन गाव बचाव संघर्र्ष समिती.बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांना समृद्धी प्रकल्पापेक्षा सात ते आठपटीने भाव मिळालाच पाहिजे. म्हातार्डी गाव हे आर झोनमध्ये असल्याने शेवटच्या शेतकºयांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहिल.- भगवान माळी, शेतकरी.म्हातार्डी गाव आर झोन असल्याने मोबादल्याचा दरही त्याचप्रमाणे मिळाला पाहिजे. आमचा बुलेट ट्रेनला विरोध नसून आम्हाला मिळणारा मोबदला समृद्धीपेक्षा जास्तच असावा. या प्रकल्पामुळे उपजीविकेचे साधन जाणार आहे. याचा सरकारने विचार करून जास्तीत जास्त मोबादला द्यावा.- सदाशिव पाटील, शेतकरी.बुलेट ट्रेन किंवा ठाणे महापालिकेचा विकस आराखडा यातील एकच काहीतरी करावे. या विकासामुळे आमच्या उपजीविकेचे साधन राहणार नाही. म्हातार्डीत ९९ टक्के शेतकरी आहेत. ज्यामुळे प्रकल्पातंर्गत बाधित शेतकºयांना नोकरी मिळालीच पाहिजे. एकजुटीशिवाय विकास अशक्य आहे.- शालिक पाटील,शेतकरी.बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांची संख्या २०० ते २५० आहे. तसेच ही गावे महापालिका क्षेत्रात आहेत. प्रत्येक गावात यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. शेतकºयांच्या वैयक्तिक अडचणीत कुणाचेही नुकसान होणार नाही. तसेच बाधितांना १०० टक्के भरपाई दिली जाईल. पण, जोपर्यंत या प्रकल्पासाठी लागणाºया जागेची मोजणी होत नाही तोपर्यंत कुणाची किती जागा या प्रकल्पात जात आहे, हे स्पष्ट होणार नाही. त्यामुळे मोजणीसाठी सहकार्य करावे. सरकारकडून जे दर निश्चित झाले आहेत. तसेच दर वाढवून देता येतील का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे आणि जास्तीत जास्त दर कसे देता येईल याचा विचार केला जाणार आहे.- सुहास परदेशी, प्रांत, ठाणे उपविभागीय अधिकारी.प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी दिवा परिसरातील शेतकºयांचा जागा देण्यास विरोध आहे. या बुलेट ट्रेनचा मार्ग वसई-ठाणे खाडीकडून नेण्यात यावा, यावर आगरी युवक संघटना ठाम आहे. शेतकºयांच्या जमिनी वाचवण्यासाठी आंदोलन अटळ आहे.- गोविंद भगत, अध्यक्ष,आगरी युवक संघटना.रेल्वे रूळासाठी १३.५ मीटर आणि त्या बाजूच्या सवर््िहस रस्त्यासाठी ४ मीटर अशी १७. ५ मीटर जागा लागणार आहे. रेल्वेच्या वेगामुळे निर्माण होणाºया कंपनांमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका पोहोचू नये याची काळजी घेतली जाणार आहे. स्थानिकांना या प्रकल्पाच्या निमित्ताने नोकरी आणि व्यवसायाच्या संधीही मोठया प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. १५ आॅगस्ट २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनसाठी तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ध्वनीप्रदूषण होणार नाही.- आर पी सिंह, व्यवस्थापक.रेल्वेमार्गासाठी साधारण १७ मीटर जागा आरक्षित केली जाणार आहे. त्या जागेपासून काही ठराविक अंतरावर बांधकाम करता येणार आहे. मात्र, यासाठी लागणारी एनओसी ही त्वरित मिळावी. त्यासाठी महापालिकेत ठराव करून तशी परवानगी मिळावी. समृद्धीप्रमाणे पाच पट मोबदला आणि २५ टक्के अतिरिक्त रक्कम मिळालीच पाहिजे.- बाबाजी पाटील,लोकप्रतिनिधी.
‘बुलेट’मुळे आगासन, म्हातार्डी गावांचे रूपच पालटून जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:31 AM