डोंबिवली: येथिल इंदिरा गांधी चौकामध्ये सीसी रोडसह पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे. पण बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्या कामात अडथळे येत आहेत. वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पादचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.इंदिरा गांधी चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरु आहे. ते काम करतांना काही रिक्षा चालक त्यांची वाहने रस्त्यात मधोमध लावत असल्याने कामात अडथळा येत आहे. वाहतूक पोलीस वॉर्डन मार्फत रिक्षा चालकांना सूचना देऊनही त्यांचे कोणी ऐकत नाहीत. त्यामुळे पेव्हर ब्लॉक लावतांना ठेकेदाराच्या कर्मचा-यांना अडचणी येत आहेत. परिणामी काम वेळेत होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच जर या गोंधळामुळे कामाच्या दर्जावर परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची अशीही चर्चा नागरिकांंमध्ये सुरु आहे. त्यासाठी एक तर काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिक्षांना पुढे येण्यास मज्जाव करणे, पूर्णवेळ वाहतूक पोलीस त्या ठिकाणी तैनात करणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.* दोन दिवसांपूर्वी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी रविावरी इंदिरा गांधी चौकातील ४० रिक्षा चालकांना शिस्तीचे धडे देत समज दिली होती. पण त्यात सातत्य हवे, त्यासाठी या ठिकाणीही कल्याणप्रमाणे आरटीओ अधिकारी हवा असे मत प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
डोंबिवलीत बेशिस्त रिक्षा चालकांमुळे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 6:00 PM
येथिल इंदिरा गांधी चौकामध्ये सीसी रोडसह पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे. पण बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्या कामात अडथळे येत आहेत. वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पादचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ठळक मुद्दे इंदिरा गांधी चौकातील कामात अडचणीवाहतूक वॉर्डनच्या सूचना धाब्यावर