शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

व्यवसाय विकासासाठी ठाण्यात रंगली उद्योगाची जत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:27 AM

लघुउद्योजकांना आपल्या उत्पादन व सेवांचे सादरीकरण करून व्यवसाय विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी एक आगळेवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्यावतीने नुकतेच लक्ष्यवेध उद्योग जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : लघुउद्योजकांना आपल्या उत्पादन व सेवांचे सादरीकरण करून व्यवसाय विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी एक आगळेवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्यावतीने नुकतेच लक्ष्यवेध उद्योग जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील टीप टॉप प्लाझा येथे १६ ते १७ नोव्हेंबर रोजी उद्योगाची जत्रा रंगली होती. या उपक्रमासाठी प्रायोजक म्हणून जॉय ई-बाईक आणि सहाय्यक प्रायोजक म्हणून सारस्वत सहकारी बँक आणि पितांबरी उद्योगसमूहाचे आयओकेईएन यांचे सहकार्य लाभले. लोकमत वृत्तसमूह या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर होते.१६ नोव्हेंबर रोजी लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ चे उद्घाटन कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. याप्रसंगी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, वेल्थ गाईडचे संचालक अरुण सिंग, यूनाईट्स बिझनेस सोल्युशन्सचे संचालक संजय ढवळीकर, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे प्रमुख मार्गदर्शक अतुल गोरे आणि लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे संचालक अतुल राजोळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुर्वे यांनी केले.लक्ष्यवेध उद्योग जत्रेच्या माध्यमातून सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त झाले. लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ मध्ये १२० उद्योजकांनी सहभाग घेऊन आपल्या उत्पादन व सेवांचे प्रदर्शन सादर केले. खास लघुउद्योजकांसाठी बँकिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, मुद्रा योजना, सौर ऊर्जा, वास्तू, शेती यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.काही विशेष उत्पादन आणि सेवांचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते लक्ष्यवेध उद्योग जत्रेमध्ये करण्यात आले. यामध्ये जॉय ई-बाईक या ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक सुपर बाइक आणि पितांबरी उद्योगसमूहाच्या आयओकेईएन डिजीटल सेक्युरिटी सोल्यूशनचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे डॉ. सुरेश हावरे लिखित ‘स्टार्ट-अप मंत्र’ या पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन देखील लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ मध्ये करण्यात आले.१७ नोव्हेंबर रोजी लक्ष्यवेध उद्योग जत्रा २०१९ चा सांगता समारंभ पार पडला. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून कॉर्पोरेट वकील नितीन पोतदार आणि दिवा महाराष्ट्राचा आणि गोवा पोतुर्गीजा या रेस्टॉरंट शृंखलेचे संस्थापक डॉ. सुहास अवचट उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहभागी उद्योजक, उपस्थित जनसमुदाय अशा सगळ्याच स्तरातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक झाले. लघुद्योजकांना प्रगतीपथावर आणण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात आयोजित करण्यात यावेत अशी भावना सर्वच मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. याशिवाय उद्योग जत्रेच्या पुढील पर्वात या उपक्रमाचा कालावधी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा करावा, अशी मागणी बहुतांशी सहभागी उद्योजक आणि उपस्थितांकडून मोठ्या आग्रहाने करण्यात आली. दोन दिवसीय विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी लक्ष्यवेध उद्योग जत्रेस भेट दिली. त्याचप्रमाणे उद्योजकांची ही खास जत्रा अनुभवण्यासाठी प्रचंड जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. एकूणच या दोन दिवसांत सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात उद्योजकांची एकजूट आणि संधीची लयलूट अनुभवण्यास मिळाली.

टॅग्स :thaneठाणेbusinessव्यवसाय