उल्हासनगर : एका वृद्धेला पोलीस असल्याची बतावणी करून हातातील दोन सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने चोरून नेल्याची घटना बुधवारी उघड झाली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोनी फाटा ते बदलापूर रस्त्याने ६२ वर्षाच्या वृद्ध चंद्रा यलूमलाई गौडर ह्या बुधवारी दुपारी अड्डीच वाजता जात होत्या. त्यावेळी दोन तरुणांनी त्यांना अडवून पोलीस असल्याचे सांगितले. हातातील ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला जातील म्हणून काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर हातचलखीने दोन्ही बांगड्या चोरून पोबारा केला. बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर, वृद्ध महिलेने हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी दोन अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.