सदानंद नाईक, उल्हासनगर : भारतीय सिंधु सभा संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तान, अफगानिस्तान व बांग्लादेश मधून आलेल्या शरणागती नागरिकांना भारत सरकारद्वारे काढलेल्या सीएए कायदा, नियमबाबत माहिती देण्यासाठी सीएए सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. याकेंद्राचा लाभ शरणागती नागरिकांनी घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.
भारत सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेश देशातून आलेल्या हिंदू, बौद्ध शरणागती नागरिकांना सीएए कायदा मंजूर केला. फाळणीच्या वेळी पाकिस्तानतून आलेल्या बहुसंख्य सिंधी समाजसह अन्य समाजाला उल्हासनगरात वसविण्यात आले. त्यानंतर शरणागती म्हणून आलेल्या नागरिकांना सीएए (भारतीय नागरिकता सहायता केंद्र) सुविधा केंद्राची सुरवात रामनवमीचे औचित्य साधून करण्यात आले. केंद्रात शरणार्थी नागरिकांना नागरिकत्वाबाबत माहिती दिली जाणार आहे. केंद्राचें उदघाटन भारतीय सिंधु सभेचे माजी अध्यक्ष व भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य दादा लाधाराम नागवानी यांच्या हस्ते बुधवारी झाले. सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. भारतीय सिंधु सभेचे राजेश अमरनानी, बंटी सुखेजा, धनवनी नागपाल आदि मान्यवर सुविधा केंद्र उदघाटन वेळी उपस्थित होते.