शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

नदी प्रदूषणाचा मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:39 PM

उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

उल्हासनगर : उल्हास नदीच्याप्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीच्याप्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या कंपन्यांची विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.उल्हास नदी प्रदुषित करणाºया खेमानी नाल्याचा प्रश्न वारंवार विधानसभेत अनेक आमदारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नाल्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल देण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. त्यानुसार कदम यांनी बुधवारी दुपारी अचानक खेमानी व उल्हास नदीची पाहणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ३६ कोटीच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळविण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. खेमानी नाल्याचे सांडपाणी अडवून विहिरीत आणले जाते. तेथून शांतीनगर येथे पाईपलाईनद्बारे नेवून मलनिस्सारण केंद्रात प्रक्रीया केली जाणार आहे. मात्र मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण न झाल्याने खेमानी नाल्याचे सांडपाणी पम्पिंगद्वारे उल्हास नदी खाडीत सोडले जात आहे. गेल्या ३ वर्षांपासून खेमानी नाला योजनेचे काम संथगतीने सुरू असून, यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही केली आहे.महापालिका आयुक्तांसह स्थानिक शिवसेना पदाधिकाºयांनाही त्यांच्या दौºयाची पूर्वकल्पना नसल्याने, ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार, उल्हासनगर पालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन, बी. एस. पाटील यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.अंबरनाथमधील प्रदूषित नाल्याचीही पाहणीअंबरनाथमधून वाहणाºया वालधुनी नदीला प्रदुषित करणाºया एमआयडीसी भागातील नाल्याचीही पाहणी रामदास कदम यांनी केली. ते कल्याण येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथील एमआयडीसी भागातील नाल्याची पाहणी केली. या भागातील सर्व नाले थेट वालधुनी नदीला जोडले गेले असल्याने नदी प्रदुषित झाली आहे.गेल्या महिनाभरापासून अंबरनाथ शहरातील प्रदुषणाचा मुद्दा हा गाजत आहे. डम्पिंगमुळे आधीच पालिका प्रशासन त्रस्त असताना, आता वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दादेखील समोर आला आहे. एमआयडीसी भागातील सर्व सांडपाण्यावर एमआयडीसीमध्येच प्रक्रिया करण्याची अट असतानादेखील अनेक कारखानदार थेट नाल्यातच प्रदुषित पाणी सोडत आहेत.यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रारदेखील करण्यात आली होती. यापार्श्वभूमिवर कदम यांनी अंबरनाथ शहरातील प्रदुषणाची माहिती घेतली. वालधुनीपाठोपाठ ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाºया उल्हास नदीच्या प्रदुषणाचीदेखील त्यांनी दखल घेतली. उल्हास नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने नदीच्या संवर्धनाबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी पर्यावरण मंत्र्याकडे करण्यात आली होती.प्रशासनाची उडाली झोपवालधुनी आणि उल्हासनदीमधील प्रदुषणाच्या मुद्यावर कदम यांनी अचानक अंबरनाथ आणि उल्हासनगरचा दौरा आयोजित केला. त्यांच्या ऐनवेळच्या दौºयाने प्रशासनाची झोप उडाली. कदम येणार असल्याने पालिकेचा ताफा या ठिकाणी हजर होता. कदम यांनी आधी नाल्याची आणि नंतर डम्पिंगची पाहणी केली. डम्पिंगवर सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी कदम यांना दिली. अंबरनाथचा दौरा आटोपून कदम लगेचच उल्हासनगमध्ये प्रदुषणाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले.वालधुनी नदीचा अहवाल मागितलाशहरातील जीन्स कारखाने बंद झाल्यावरही वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले आहे. वालधुनी नदीमध्ये कोणत्या नाल्यामुळे प्रदूषण होते, याची इत्थंभूत माहिती पुढील आठवड्यात देण्याचे आदेश पालिका आयुक्त अच्यूत हांगे यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणRamdas Kadamरामदास कदम