मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या नारायणा शाळे समोरच्या गार्डन कोर्ट इमारतीत नरेंद्र जालान हे राहतात . त्यांना डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यांच्याकडे काम करणारा भोला उर्फ विशाल यादव हा नऊ महिन्या पूर्वी काम सोडून गेला होता . मात्र तो अधून मधून जालान यांच्या कडे येत - जात असे . जालान यांचा ३१ डिसेम्बर रोजी वाढदिवस असल्याने भोला हा रात्री नऊ वाजता जळण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आला होता . जालान यांच्या आईशी बोलता बोलता त्याने जळण यांच्या पत्नीचा २५ हजारांचा मोबाईल चोरून नेला होता.
घरात जालान यांच्या पत्नी व त्यांनी मोबाईल शोधला असता तो सापडत नसल्याने त्यावेळी त्यांच्या आईच्या लक्षात आले कि , तो मोबाईल भोला याच्या हातात दिसला होता . त्याने मोबाईल चोरल्याची खात्री झाल्याने भाईंदर पोलीस ठाण्यात जालान यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी भोला उर्फ विशाल अरविंद यादव ( २७ ) रा . गल्ली क्र . ७ , शिवनेरी नगर , राई , भाईंदर ह्याला १ जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली आहे .