कलाण - कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर बेकायदा बांधकामे आहे. त्यापैकी काही चाली रेल्वे आणि वनखात्याच्या जागेवर आहे. त्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. या जागा नागरीक नियमित करु शकत नाही. त्यामुळे या जागा नियमीत करुन चाळीत राहणा:या नागरीकांना दिला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हिंदूराव यांनी भेट घेतली. या भेटीपश्चात त्यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश हनुमंते, भरत गोंधळी, प्रसाद महानज, प्रवीण खरात, रेखा सोनवणे आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष हिंदूराव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास खात्याचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे हा प्रश्न त्यांना चांगला माहिती आहे. त्यात त्यांनी लक्ष घालून नागरीकांना दिलासा द्यावा. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत टिटवाळा येथे मेडीकल कॉलेजकरीता भूखंड आरक्षित आहे. त्याठिकाणीही मेडिकल कॉलेजच्या उभारणीकरीता मंजूरी द्यावी. त्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाठपुरावा करावा असे सूचित केले आहे. कल्याण मुरबाड तालुक्यात इंडस्ट्रीय इस्टेट सुरु करण्यात यावी. मेट्रो रेल्वे कल्याणपर्यंत आहे. तिचा विस्तार करुन ती उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि मुरबाड पर्यंत करण्यात यावी. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यासाटी स्वतंत्र वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे.
तसेच माजी अर्थ मंत्री अजित पवार यांनी कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या उभारणीकरीता निधीची तरतूद केली होती. प्रकल्पासाठी एकूण ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ४०० कोटीचा हिस्सा राज्य सरकारकडून खर्च केला जाणार आहे. तो तात्काळ उपलब्ध करुन द्यावा याकडेही हिंदूराव यांनी मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आहे.