शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

लग्नाचे अमिष दाखवून लूट करणा-यास अटक, दागिन्यांसह एक लाखाचा ऐवज हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 7:57 PM

आपण अविवाहित असल्याची बतावणी करुन एका ३८ वर्षीय विधवेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून ८६ हजारांच्या दागिन्यांसह एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत सीताराम पवार (२९, रा. भांडूप) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : आपण अविवाहित असल्याची बतावणी करुन एका ३८ वर्षीय विधवेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून ८६ हजारांच्या दागिन्यांसह एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत सीताराम पवार (२९, रा. भांडूप) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून फसवणूकीतील सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुशांत भांडूपच्या सर्वोदयनगर भागात वास्तव्याला असून तो विवाहित आहे. त्याची पत्नी चार महिन्यांची गरोदर आहे. मात्र, त्याने ही सर्व माहिती दडवून ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरुन वाडा (जिल्हा पालघर) येथील महिलेची माहिती काढली. तिच्या बहिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याने तिच्याशी जवळीक साधली. नंतर तिला लग्नाचे अमिष दाखविले. मार्च २०१८ मध्ये आपण लग्न करू, असेही तो तिला म्हणाला. मध्यंतरीच्या काळात आई आजारी असल्याचे कारण दाखवून त्याने दागिने विकण्यास तिला भाग पाडले. त्यासाठी ठाण्याच्या रामचंद्रनगर येथील ‘सागर ज्वेलर्स’ या दुकानात तिला नेले. तिथे तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्याकडील १६ ग्रॅम ५०० मिली ग्रॅम वजनाची सोनसाखळी तसेच इतर दागिने आणि १६ हजारांची रोकड असा एक लाख दोन हजार १०० रुपयांचा ऐवज तिच्या पर्समधून काढून त्याने ३० आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ६ ते १०.३० वाजण्याच्या सुमारास पलायन केले. याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी तिने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने त्याला सोमवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडून रोकड आणि दागिने असा एक लाख दोन हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा