मीरारोड - भाईंदरच्या उत्तन गावातील "स्वर्गदिप" ह्या मासेमारी बोटीला खोल समुद्रात शुक्रवारी अद्वैता मुंबई ह्या खाजगी मालवाहतूक जहाजाने धडक दिली. मासेमारी बोटीचे नुकसान झाले असून सुदैव जीवित हानी झाली नाही.
उत्तन येथील पातान बंदर ची स्वर्गदीप ही मासेमारी बोट उत्तन - अर्नाळा पासून खोल समुद्रात मासेमारी करत होती. बोटीवर १८ मच्छीमार होते. जाळी टाकून मच्छीमार शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी पहाटे बोटीवर आराम करत होते. पहाटे पाचच्या सुमारास खोल समुद्रात "अद्वैता मुंबई" ह्या खाजगी मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने मच्छीमार खडबडून उठले. मोठे जहाज ची धडक बसल्याचे व बोटीचे नुकसान लक्षात ते संतप्त झाले. परंतु जहाज मच्छीमारांची विचारपूस न करता निघून गेले. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी बोटीचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाता प्रकरणी जहाज चालक मालक वर गुन्हा दाखल करावा व मच्छीमारांना बोटीचे नुकसान ची भरपाई करावी. शासनाकडून तातडीने पंचनामा मच्छीमारांना न्याय मिळावा अशी मागणी मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी केली आहे .