शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

एका डोळ्यात समाजाची, तर दुसऱ्यात कुटुंबाची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 12:20 AM

कोरोना काळातही पत्करली जोखीम : संवेदनशील महिला आल्या रुग्णांच्या मदतीला धावून, जीवावर उदार होऊन केले काम

केवळ जागतिक महिलादिनीच महिलांचा सन्मान करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. चूल आणि मूल यात अडकलेली महिला आज स्वतंत्र असून, ती स्वत:च्या पायावर उभी राहून घर सांभाळत आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने ठसा उमटवला आहे. खासकरून कोरोनोच्या काळात अनेक डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्त्या यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. एकीकडे जीवावर उदार होऊन समाजासाठी काम करत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या डोळ्यात कुटुंबाची काळजीही दिसत होती. जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना काळात काम केलेल्या अशाच काही कोरोनायोद्धा महिलांचे अनुभवनकथन मांडण्याचा ‘लोकमत’ने केलेला हा प्रयत्न...

‘वॉर्डात जाताना युद्धाला जात असल्यासारखे वाटायचे’

अनेक रुग्ण आजारातून बरे झाल्याने मिळाले समाधान

ठाणे : कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात खूप गोंधळ उडाला होता. कोरोनाच्या उपचाराविषयी सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु कोरोना रुग्ण कसा असतो, हे कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे गोंधळ आणि रुग्णाची काळजी यात मी अडकले होते. वरिष्ठांनी मनोधैर्य वाढविले, तसे या संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळाली. कोरोना वॅार्डमध्ये जाताना एखाद्या युद्धाला जात असल्यासारखे वाटत होते. या युद्धाशी लढणारे आम्ही जणू सैनिक असून, हे युद्ध कोणत्याही परिस्थीतीत जिंकायचेच, अशा भावना मनात यायच्या. आपल्या हातून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी पोहोचले, याचे आज समाधान वाटते, अशी भावना सिव्हील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. वंदना पाटील यांनी व्यक्त केली.  

डॉ. पाटील या कोरोना काळात आपल्या घरापासून तब्बल तीन महिने दूर होत्या. रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या कोरोना रुग्णावर त्यांनी उपचार केले. रुग्ण सेवा हीच इश्वर सेवा या उक्तिला त्या खऱ्या उतरल्या. त्यांचे अनुभव सांगताना त्या  म्हणाल्या, आम्ही एका कुटुंबासारखे काम करीत होतो. त्यामुळे एकमेकांचे सांत्वन करायचो. बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. कॅलेण्डर तर माहीत नव्हते. वार, तारीख लक्षात राहात नसत. सण - उत्सव कधी आले, हे कळलेही नाही. डोळ्यांसमोर एकच ध्येय होते. ते म्हणजे या संकटातून समाजाला बाहेर काढायचे. त्यासाठी आम्ही सर्व डाॅक्टर, इतर सहकारी कर्मचारी जीवाभावाने, तहानभूक विसरुन परिश्रम घेतले, असे डाॅ. पाटील म्हणाल्या. 

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार