पारोळ : मंगळवारी रात्री खानिवडे गावातील मोकाट गुरे चोरण्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या जागरूकतेमुळे फसला आणि चोरट्यांनी कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.संपूर्ण राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला असला तरी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर राजरोसपणे गायींची तस्करी चालू आहे. पूर्वी हे चोरटे गायी चोरण्यासाठी टेम्पो किंवा ट्रकचा वापर करायचे. पण आता गायींची तस्करी करण्यासाठी कारचाही वापर होऊ लागला आहे, हे खानिवडे येथील घटनेवरून दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री काही तरुण दवाखान्यात जात असताना काही अनोळखी व्यक्ती तेथील गायींना काहीतरी करत असल्याचे दिसले. त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न असता एका कारमध्ये गायींना कोंबत असल्याचे त्या मुलांनी पाहिले, तर दुसऱ्या गायीला डिकीत कोंबले. तेव्हा ती गुरे चोरणारी टोळी असल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्यानंतर या युवकांनी गावात संपर्क साधून नागरिकांना बोलवून घेतले. नागरिक मोठ्या संख्येने येताना पाहून चोरट्यांनी कार नागरिकांच्या अंगावर घालत महामार्गावरून गुजरातच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागरिकांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग सुरू केला. पण चोरटे फरार झाले. (वार्ताहर)मांडवी पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात चालकाच्या सीटपासून ते डिक्कीपर्यंत गुरे कोंबण्यासाठी जागा बनविल्याचे आढळले. तसेच गायींना गुंगीचे औषध देऊन कोंबले जात असल्याचे दिसले.
कारच्या डिकीत कोंबून गायींची चोरी
By admin | Published: October 15, 2015 1:31 AM