उल्हासनगर : हाफमर्डर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे माहिती असूनही फॉर्महाऊस मध्ये लपवून ठेवून राहने व जेवणाची व्यवस्था करणाऱ्या ५ जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी हाफमर्डर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट परिसरात गेल्या महिन्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सोहम अनिल पवार, यश सुरेश पवार व धीरज हरीश रोहेरा यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत असतांना तिघेही पुणे जुन्नर येथील एका गावच्या विघनहर्ता ट्रस्ट मालकाने त्याच्या फार्महाऊस मध्ये लपविल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्याठिकाणी त्यांच्या राहणे व जेवणाची व्यवस्था केली होती. पोलिसांनी गुन्हेगार असल्याचे माहिती असूनही त्यांना पोलिसपासून लपवून आश्रय दिल्या प्रकरणी ऋतिक उर्फ अटल अनिल शुक्ला, गोपाळ सत्यवान पाटील, सुमित सत्यवान पाटील व गीता खरे यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चक्क फार्म हाऊस मध्ये गुन्हेगाराला लपवून ठेवून त्यांची खाण्याची व राहण्याची व्यवस्था केल्या प्रकरणी तब्बल ५ जणांवर उल्हासनगर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केल्याने, धनदांडक्यात पोलीस वचक बसला आहे. उल्हासनगर पोलिसांनी हाफमर्डरच्या गुन्ह्यातील सोहेल पवार, यश पवार व धीरज रोहेरा यांना अटक केली असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आह.