ठाणे : भिवंडी प्रांत कार्यालयात मंगळवारी पडलेला लाच लुचपत विभागाचा छापा हा प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी मागितलेल्या लाच प्रकरणासाठी असल्याचा आरोप, श्रमजीवी संघटनेचेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केला. यामुळे त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याची मागणी लावून धरीत त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावे, त्यांच्यासाठी दबाव आणणारा लोकप्रतिनिधी कोण आहे. याचाही उलगडा करावा आदी मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आता लावून धरल्या आहेत. यासाठी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही निवेदन देऊन सुचित केले आहे.लाच लूचपत विभागाच्या या यशस्वी धाडीमध्ये नळदकर या तक्ररीत गुंतू नये म्हणून राजकीय दबाव आणणारा लोकप्रतिनिधी कोण? याचा उलगडा होऊन त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पंडित यांनी केली आहे. या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशी होऊन नळदकर यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी आणि त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी मुख्यमत्र्यांकडे केलेल्याचे सुतोवाच देखील पंडित यांनी करून श्रमजीवी संघटना आता आक्र मक झाली असून भ्रष्ट अधिकाऱ्याला थारा देणार नसल्याची भूमिकाही त्यांनी या प्रकरणी स्पष्ट केली.लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालयात मंगळवारी छापा मारून अस्नोली येथील फेरफार प्रकरणात चौदा लाख रु पयांची लाच घेताना येथील स्टेनो कांबळे यांना पकडले. मात्र रात्री उशिरापर्यंत प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांची चौकशी करून त्यांना पहाटे त्यांना सोडण्यात आले आणि फक्त स्टेनो कांबळे यांना आरोपी केले. पण भिवंडी प्रांत कार्यालयात पडलेला लाच लुचपत विभागाचा छापा हा नळदकर यांनी मागितलेल्या लाचे प्रकरणासाठीच होता. ज्या स्टेनो ला फेरफार मध्ये कोणताही निर्णय घेण्याचा किंवा आदेश करण्याचा अधिकारी नाही, अशा व्यक्तीकडून चौदा लाखाची लाच मागितली जाणे हे बुद्धीला पटणारे नसून ते तात्विक दृष्ट्याही योग्य वाटत नसल्याचे पंडित यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.डॉ.मोहन नळदकर हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी म्हणून परिचित आहेत, भिवंडी येथे येण्यापूर्वी वाडा येथे त्यांनी रिलायन्स गॅस लाईन कामामध्ये शेतकऱ्याना छळून प्रचंड माया गोळा केली, ताशा तक्ररीही वारंवार झाल्याचा आरोप पंडित यांनी आपल्या पत्रात केला. ठाणे, पालघर जिल्ह्यात रिलायन्स, गेल, मुंबई- वडोदरा एक्सप्रेस हायवे, विरार - अलिबाग मल्टी मॉडेल करिडॉर, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे यासारखे सुमारे २४ प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्याना असे भ्रष्ट अधिकारी उध्वस्त करताना दिसत आहेत, डॉ.न् ाळदकर या अधिकाऱ्याची वाडा येथील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसताना भिवंडी येथे बदली करण्यात आली, यात भिवंडीला असलेल्या प्रांत अधिकाऱ्याची देखील कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना नळदकर यांना भिवंडीत आणण्यासाठी बदली करण्यात आली. हे सगळे षडयंत्र रचून ते प्रत्यक्षात उतरविणार लोकप्रतिनिधी कोण? असा सवालही पंडित यांनी आपल्या पत्रात विचारला आहे.
लाच प्रकरणी भिवंडी प्रांतच्या निलंबनासह मालमत्तेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्याना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 5:28 PM
लाच लूचपत विभागाच्या या यशस्वी धाडीमध्ये नळदकर या तक्ररीत गुंतू नये म्हणून राजकीय दबाव आणणारा लोकप्रतिनिधी कोण? याचा उलगडा होऊन त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पंडित यांनी केली आहे. या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशी होऊन नळदकर यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी आणि त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी मुख्यमत्र्यांकडे केलेल्याचे सुतोवाच देखील पंडित यांनी करून श्रमजीवी संघटना आता आक्र मक झाली असून भ्रष्ट अधिकाऱ्याला थारा देणार नसल्याची भूमिकाही त्यांनी या प्रकरणी स्पष्ट केली.
ठळक मुद्देव्यक्तीकडून चौदा लाखाची लाच मागितलीस्टेनो ला फेरफार मध्ये कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारी नाही... आणि फक्त स्टेनो कांबळे यांना आरोपी केले. धाडीमध्ये नळदकर या तक्ररीत गुंतू नये म्हणून राजकीय दबाव आणणारा लोकप्रतिनिधी कोण?