शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

शेतकऱ्यांची जमीन बळकावल्या प्रकरणी २२ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर ७११ हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 3:26 PM

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे .

मीरारोड - पोलीस व पालिकेस सतत तक्रारी केल्यावर  भाईंदरच्या स्थानिक भूमिपुत्र शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय  ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे . सदर जमिनीवर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने बळजबरी कुंपण घालून आत मध्ये काही झोपड्या उभारल्या होत्या . सदर प्रकार समजल्यावर मे २०१९ पासून रकवी कुटूंबियांनी मीरारोड पोलीस ठाणे आणि महापालिके कडे सतत तक्रारी चालवल्या होत्या . परंतु पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते . 

तर दुसरीकडे अमोल व गजेंद्र रकवी यांनी पोलिस व पालिकेत तक्रारी चालवल्या होत्या .  कंपनीचे मुख्य भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहतांसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती . रकवी कुटुंबीय त्यांची जमिनी कब्जा करणाऱ्यां विरोधात उभे ठाकले . २४ नोव्हेम्बर २०२० रोजी मीरारोड पोलिसांनी ६८ वर्षीय अमोल रकवी यांचा जबाब नोंदवून घेतला होता . दरम्यान पोलिसांनी कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांना बोलावून जागेस घातलेले कुंपण व अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते . परंतु कंपनीने काहीच केले नाही . 

परंतु अमोल सह गजेंद्र रकवी, सचिन पाटील ,  महेश राऊत आदींनी पाठपुरावा सुरु ठेवला .  पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्या कडे तक्रार केली . सततच्या पाठपुराव्या नंतर पोलिसांनी त्यांच्या विधी अधिकारी यांच्या कडून अभिप्राय मागवला असता त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय दिला . 

तब्बल २२ महिन्यांनी पोलिसांनी अमोल रकवी यांची फिर्याद शुक्रवारी घेतली . घुसखोरी करून कुंपण घालणे , बेकायदा कब्जा करून तेथे ७ - ८ कच्चे बांधकाम करणे आदी प्रकरणी पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स संस्थेने , संचालक संजय सुर्वे व इतर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

६८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार अमोल रकवी म्हणाले कि , भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या जमिनी बळकावणाऱ्या माफियां विरुद्ध कारवाई साठी पोलीस व पालिके कडून अशी वर्ष नु वर्ष लावली जातात ह्याला कायद्याचे राज्य म्हणावे कि माफियांचे ? असा मला प्रश्न पडला आहे . पोलीस आता तरी मेहतांसह कंपनीचे त्यांचे अन्य भागधारक , संचालक आणि संबंधित लोकांवर कठोर कारवाई करून कायद्याची जाणीव करून देतील अशी अपेक्षा आहे .  

या आधी देखील मेहतांच्या कंपनीने  आमच्या मालकी जागेचा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पडला होता . तर आणखी एका भूमिपुत्राच्या सुमारे ३७ जमिनी देखील बनावट स्वाक्षरी व बनावट मुखत्यारपत्र द्वारे विकल्याचे तक्रार सुद्धा गंभीर असल्याचे रकवी म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर