मीरारोड - भाईंदर पश्चिमच्या भाजपा नगरसेविका नयना गजानन म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागातील एका रहिवाश्याच्या डोक्यात दगड जखमी केले तर त्याच्या आई , पत्नीस शिवीगाळ भावास मारले म्हणून भाईंदर पोलिसांनी नगरसेविके विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
नयना म्हात्रे भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा ते मोरवा व दीडशे फूट मार्ग भागातील भाजपाच्या नगरसेविका आहेत . त्या मुर्धा येथे राहतात . तेथील रेव आगार येथे राहणारे रहिवाशी दिलीप बनसोडे यांच्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बनसोडे हे गुरुवारी सायंकाळी घरी असताना म्हात्रे यांचा कार्यकर्ता असलेल्या अमरेंद्र नावाच्या इसमाचा पाळीव श्वान अंगावर धावून गेला . बनसोडे यांची पॅन्ट धरली . त्यावरून बनसोडे याने सुटकेसाठी श्वानास दगड मारला असता अमरेंद्र याने शिविगाळ करत मारण्याची दिली . बनसोडे घरी निघून आले .
सदर प्रकार कळताच काही वेळात नगरसेविका नयना म्हात्रे बनसोडे यांच्या घरात शिरून बनसोडेसह , त्यांची आई व भाऊ राहुल यास शिवीगाळ करू लागली . राहुलला मारले तर पत्नीस धक्का मारला . नंतर दगड घेऊन नयना यांनी बनसोडे यांच्या डोक्यावर मारला. त्यामुळे ते जखमी झाले . सदर फिर्यादी नुसार पोलीसांनी नयना व अमरेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .