प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, व नवी मुंबई या जिल्हयांच्या महसुली हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश असतानाही पोलीसांच्या परवानगीशिवाय दिलेल्या कालावधी आधीच महसुली हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी मनाई आदेशाचा भंगाचा गुन्हा वागळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. जयेश सुधाकर जाधव (वय २४ वर्षे, रा.लुईसवाडी, वागळे इस्टेट) असे आरोपीचे नाव आहे. त्याला १८ महिन्यांसाठी महसुली हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.
आरोपी जाधव यास वागळे इस्टेट परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त यांनी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी १८ महिने कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. परंतू या आरोपीला नमूद महसुली जिल्हयामध्ये ठाणे पोलीस आयुक्त व वागळे इस्टेट परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना त्याने या मनाई आदेशाचा भंग करून केला. आरोपी शुक्रवारी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास, साईनाथनगर, लुईसवाडी येथे वागळे इस्टेट पोलीस ठाणेच्या पथकास दिसून आला. या प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. ।। ९६३/२०२४ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बी.एन.एस.एस.कलम ३५ (३) प्र्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.