उल्हासनगर : शहरात अवैध विनापरवाना होर्डिंग लावणारा ठेकेदार पंचशील ऍडव्हरटाईज यांच्यासह दोन जमीन मालकाला विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महापालिकेने विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्या एकून ४७ जनाला नोटिसा दिल्याने, त्यांच्यावरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेने विविध जाहिरात ठेकेदाराला शहरातील ६७ ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली. प्रत्यक्षात शहरात शेकडो होर्डिंग लागलेले आहेत. मुंबई येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर महापालिकेला खळबळून जाग आली. आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानंतर होर्डिंगचे सर्वेक्षण केले असता ६७ अधिकृत तर ४७ विनापरवाना होर्डिंग असल्याचे उघड झाले. विनापरवाना होर्डिंगला महापालिकेने नोटिसा देऊन कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेच्या कारवाईनंतर काही जाहिरात ठेकेदारांनी विनापरवाना लावलेले जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू केले. तर ज्यांनी विनापरवाना जाहिरात फलक काढले नाही. अश्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. कॅम्प नं-३ येथील प्रवेशद्वार गेट व हिंदी शाळे जवळील दोन विनापरवाना जाहिरात फलक लावणाऱ्या पंचशील जाहिरात ठेकेदार सागर शर्मा, रामदास वेताळ, नरसु निहलानी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोन जाहिरात फलक लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या जागा मालक व एजन्सी मालक यांचेविरुध्द भारतीय दंड सहिता कलम ३३६, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४४, २४५ व महाराष्ट्र मालमत्तेस विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ कलम ३ अन्वये सहायक आयुक्त, प्रभाग समिती यांनी गुन्हे दाखल करण्यात येत आहे.