आरएसएसच्या अवमान याचिका प्रकरणी राहूल गांधी १२ जून रोजी भिवंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:34 PM2018-05-02T22:34:02+5:302018-05-02T22:34:02+5:30
भिवंडी : लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएसवर केलेल्या आरोपा प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल आहे. या याचिकेची आज दुपारी रोजी सुनावणी झाली.मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांच्या स्थानिक वकीलांनी मागणी केल्यानुसार दोषारोप मांडण्यासाठी कोर्टाने १२ जून रोजी दोन्ही पक्षाच्या वकीलांसह राहूल गांधी यांना हजर रहाण्यास सांगीतले आहे.
तालुक्यात सोनाळे गावातील मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्ये प्रकरणी आरएसएस संघटनेवर आरोप केला.त्यामुळे आरएसएसचे जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहानी याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आज भिवंडी कोर्टात झाली.
भिवंडी कोर्टात मागील सुनावणीच्या वेळी राहूल गांधी गैरहजर असताना त्यांच्या वकीलांनी ही केस ऐतिहासीक असल्याने कोर्टापुढे सबळ पुरावा यावा आणि वस्तुस्थिती समोर यावी या साठी समरी ट्रायल प्रक्रियेव्दारा न चालविता ती समन्स ट्रायल प्रक्रि येद्वारे चालवावी,अशी मागणी केली होती.त्यानुसार कोर्टासमोर विविध पुस्तके,कोर्टाचे निकाल,पुरावे व साक्षीदार तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी दोषारोप मांडणीसाठी राहुल गांधी याच्यासह दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे वकीलांनी हजर रहावे,असे न्यायाधिश ए.ए.शेख यांनी कोर्टात सांगीतले. यावेळी राहुल गांधी यांची बाजू अँड.कुशाल मोर व अँड.नारायण अय्यर यांनी मांडली.तर याचिकाकर्त्याची बाजू अँड.नंदू फडके यांनी मांडली.या याचिकेबाबत दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये उत्कंठा वाढीस लागली आहे.