ठाणे : ठाणे महापालिकेचे माजी महापौर नईम खान यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांविरूद्ध वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी जवळपास ८0 हजार रुपयांची वीज चोरी केल्याची तक्रार आहे.मुंब्रा येथे वास्तव्यास असलेले ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांच्या घरी गत महिन्यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. सुमारे एक लाख रुपये दंडाची नोटीसही त्यांना बजावण्यात आली होती. मुंब्रा, दिवा परिसरात महावितरणची वीज चोरी तपासणी मोहीम सुरू आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी महावितरणचे सहायक अभियंता शशिकांत उदुगडे हे दिवा येथील फडके पाड्यामध्ये तपासणी करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक साजिद अन्सारी यांनी त्यांच्या मच्छिच्या व्यवसायासाठी थेट सर्व्हिस वायरमधून वीज पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले. गत सहा महिन्यांपासून होत असलेल्या या गैरप्रकारामुळे महावितरणच्या १८९0 युनिटची वीज चोरी झाली. त्यामुळे महावितरणचा ३१ हजार ९५0 रुपयांचा महसूल बुडाला. अधिकाºयांनी येथील वीज पुरवठा खंडित करून थेट वीज पुरवठ्यासाठी वापरलेली वायर जप्त केली. उदुगडे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी कल्याण येथे साजिद अन्सारी आणि अश्रफ अली चौधरी यांच्याविरूद्ध ९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.तत्पूर्वी, ६ डिसेंबर रोजी महावितरणने दिवा येथील खर्डीगाव येथे वीज चोरी तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा-दिवा ब्लॉकचे कार्याध्यक्ष विजय अनंत भोईर यांच्या बारमध्ये थेट सर्व्हिस वायरमधून वीज पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले. दिवा येथील सिद्धी विनायक गार्डन इमारतीमधील बारचा अवैध विद्युत पुरवठा खंडित करून, त्यासाठी वापरलेली वायर जप्त केली. सहा महिन्यांमध्ये १0१६ युनिटची वीज चोरी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महावितरणचा ५५ हजार ४00 रुपयांचा महसूल बुडाला असून, याप्रकरणी विजय भोईर यांच्याविरूद्ध ७ डिसेंबर रोजी कल्याण येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या मोहिमेमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांविरूद्ध वीज चोरीचे गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:41 PM
महावितरणच्या वतीने वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह एका पदाधिकाºयाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देमाजी नगरसेवकाचाही समावेश८0 हजार रुपयांची वीज चोरीमहावितरणची कारवाई