-------------------
दुचाकीची चोरी
कल्याण : पश्चिमेतील रामबाग लेन १ मधील श्रीनिकेतन या बिल्डींगमध्ये राहणारे गणेश चौधरी यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या बिल्डींगच्या आवारात उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याचा प्रकार १५ ऑगस्टच्या मध्यरात्री घडला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------------
खरेदीच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास
कल्याण : विरेंद्र शंकलेशा यांचे रेल्वेस्थानक परिसरातील नारायणवाडीत मुथा गोल्ड हे ज्वेलर्सचे दुकान आहे. तेथे शुक्रवारी रात्री ८.४५ च्या सुमारास एक व्यक्ती आली. त्याने मंगळसूत्र खरेदी करावयाचे आहे ते दाखवा असे सांगितले. त्यावर दुकानातील सेल्समनने त्यांना मंगळसूत्राचे विविध प्रकार दाखविले. दरम्यान, संबंधित व्यक्तीने यातील एक मंगळसूत्र आपल्या पॅंटच्या मागील खिशात टाकून तो पसारा झाला. शंकलेशा यांच्या तक्रारीवरून एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------
मोबाईल चोरी
डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा, कांचनगाव येथे राहणारे प्यारे अब्दुलकयूम रजा यांच्या राहत्या घरातून त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------
चौघांची मारहाण
कल्याण : खडेगोळवलीतील रहिवासी यश चव्हाण याला चौघांनी मारहाण आणि मनगटावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास पुणेलिंक रोडवरील विनायक कॉलनी सोसायटीसमोर घडली. यश याचा मित्र वैभव याच्याशी विशाल यादव, किटू, आकाश उर्फ पोट्या आणि मनदीप यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. यश हा वैभवबरोबर फिरतो म्हणून चौघांनी हा हल्ला केल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------