लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चाकूच्या धाकावर मोबाईलसह रोकड चोरणाऱ्या रमजानअली शेख (२२), वसीम मुस्ताक अहमद अन्सारी (२३) आणि समशाद रमजान शेख (२१) या त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून जबरी चोरीतील १८ हजार ७०० रुपयांचे चार मोबाईल हस्तगत केले आहेत. चौकशीमध्ये त्यांनी अशाच एका लुटमारीमध्ये एकाचा खून केल्याचीही कबूली दिली आहे.भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पाईपलाईन परिसरात नागरिकांना चाकूच्या धाकावर लुटणाºया चोरटयांनी गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातला होता. दरम्यान, शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेच्या भिवंडी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंगे हे करीत होते. नागरिकांना लुटणाºया टोळीतील तिघे पाईपलाईन परिसरात आल्याची ‘टीप’ शिंगे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी युनिटच्या पथकाने सापळा लावून रमजानअली शेख याच्यासह तिघांना ३१ डिसेंबर २०२० रोजी अटक केली. तिघेही भिवंडीतील आझादनगर, शांतीनगर भागातील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून जबरी चोरीतील चार मोबाईल हस्तगत केले असून त्यांना ७ जानेवारी २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* सखोल चौकशीमध्ये यातील आरोपी रमजान अली शेख, समशाद शेख आणि यातील फरार आरोपी हिरायत शेख यांनी मिळून दोन वर्षांपूर्वी पाईप लाईनच्या रोडवर भूमी वर्ल्ड ते डोंगराळी गाव कमान या दरम्यान एकाचा मोबाईल आणि रोकड जबरीने चोरी करतेवेळी चाकूने वार करुन खून केल्याचीही त्यांनी कबूली दिली. या गुन्हयातील बटन चाकूही त्यांच्याकडून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चाकूच्या धाकावर मोबाईलसह रोकड चोरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 12:06 AM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : चाकूच्या धाकावर मोबाईलसह रोकड चोरणाऱ्या रमजानअली शेख (२२), वसीम मुस्ताक अहमद अन्सारी (२३) आणि ...
ठळक मुद्दे गुन्हे शाखेच्या भिवंडी पथकाची कामगिरीखूनाचाही गुन्हा उघड