ठाणे - मागील आठवड्यात दोन दिवसाआड घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर भागात घरफोडींच्या घटना वाढल्या आहेत. या घटनानंतर अद्याप पोलिसांच्या हाती चोर सापडलेले नाहीत. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी आता स्थानिकांनीच मानवी साखळी तयार केली असून रात्रीची गस्त सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी सुध्दा या भागात रात्रीची गस्त वाढविली आहे. मागील आठवड्यात घोडबंदर भागातील मानपाडा भागात पहाटेच्या सुमारास सहाच्या आसपास चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांनंतर येथील रहिवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या चोरींच्या घटनांमध्ये चोरट्यांनी महापौरांच्या बहिणीच्या घरावर सुध्दा डल्ला मारला होता. या घटनांमुळे हा परिसर हादरा असतांनाच दोन दिवसांनी पुन्हा या भागात चोरीच्या दोन घटनासमोर आल्या. यामध्ये एका बेरीवाल्याचे दुकान फोडण्यात आले आहे. तर दुसऱ्या घटनेतही घरातून ऐवज लंपास झाला आहे. वाढत्या या चोरींच्या घटनांनी मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर, शिवाजी नगर या भागांंना टारगेट केले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे सुध्दा या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परंतु आता या चोरांना पडकण्यासाठी स्थानिकांनीसुध्दा पुढाकार घेतला आहे. ४० ते ५० स्थानिक तरुण मंडळी मागील तीन ते चार दिवसापासून मानपाडा, मनोरमा नगर, शिवाजी नगर, आझादनगर भागात रात्रीच्या गस्तीवर फीरु लागले आहेत.या तरुणांच्या हाती बॅटरी, स्टॅम्प किंवा काठी ठेवली जात आहे. जेणे करुन एखाद्याने हल्ला केला तर किमान त्याला प्रतिक्रार करणे सोपे जाईल या उद्देशाने हे साहित्य हाती ठेवण्यात आले आहे. या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ दोन ते तीन मुले थांबत असून एखादा अनोळखी इसम दिसल्यास त्याचा मोबाइल नंबर घरचा पत्ता विचारला जात आहे. शिवाय घरपर्यंतसुध्दा जात आहेत. तसेच काही छोट्या गल्यांमध्ये वीजेची व्यवस्था नसल्याने तेथील रहिवाशांना घराबाहेरील लाईट सुरु ठेवण्यासाठी सांगितले जात आहे. तसेच घराचा दरवाजा व्यवस्थीत बंद ठेवावा असेही सांगितले जात आहेत. पोलीससुध्दा या तरुणांच्या मदतीला गस्त देत आहेत.मागील आठवड्यात चोरीच्या घटना वाढल्याने ही रात्रीची गस्त सुरु केली आहे. लोकांची सुरक्षा ही खुप महत्वाची आहे. त्यामुळेच चोर सापडे पर्यंत ही गस्त सुरु राहणार आहे.(राजेंद्र शिंदे - शिवसेना, उपविभाग प्रमुख, घोडबंदर)
चोरांना पकडण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांची रात्रीची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 4:48 PM
वाढत्या चोरींचा बिमोड करण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीची गस्त सुरु केली आहे. मागील चार दिवसापासून ही गस्त सुरु असून, जो पर्यंत चोर पकडला जात नाही, तो पर्यंत ही गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देपोलीसांची गस्त सुरुमुख्य प्रवेशद्वावरही विशेष लक्ष