शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

अल्पवयीन मुलाच्या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी: आरोपीच्या भावानेच केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 9:18 PM

केवळ संशयावरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी विवस्त्र करून बेदम मारहाण केली असून स्थानिक गाववाल्यांच्या दबावाला बळी पडून यात गोवल्याचा आरोप इम्तियाज आलम याच्यासह त्याचे वकील सुनिल रवानी यांनी मंगळवारी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार केली आहे.

ठळक मुद्देडोंबिवलीतील मुलावरील लैंगिक अत्याचार आणि हत्येचे प्रकरण केवळ संशयावरून पोलिसांची पाच भावांना बेदम मारहाण झाल्याचा आरोपमुख्यमंत्र्यांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार

ठाणे : डोंबिवलीतील सात वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचारानंतर खून प्रकरणाला आता वेगळेच वळण आले आहे. यातील आरोपींना केवळ संशयावरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी विवस्त्र करून बेदम मारहाण केली असून स्थानिक गाववाल्यांच्या दबावाला बळी पडून यात गोवल्याचा आरोप इम्तियाज आलम याच्यासह त्याचे वकील सुनिल रवानी यांनी मंगळवारी केला. याप्रकरणी सीबीआय मार्फतीने चौकशीची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांकडे केली आहे.डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आॅर्चिड इमारतीच्या मल:निस्सारण टाकीत २५ मे २०१८ रोजी एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. त्याला नशेचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनाच्या तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर त्याला टाकीत फेकून दिले होते. या गंभीर प्रकारातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे स्थानिक गाववल्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर अनेक मोर्चे आंदोलने केली होती. त्यानंतर १७ जुलै २०१८ रोजी एहसान आणि नदीम आलम या दोघा भावांना अटक केली होती. तत्पूर्वी पोलिसांनी या इमारतीत नळ दुरुस्तीचे काम करणाऱ्या ऐहतशान, आरमान आणि इम्तियाज आलम यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या पाचही जणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप इम्तियाजने केला. केवळ संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एहसान आणि नदीम या दोघांना तर विवस्त्र करून ‘थर्ड डिग्री’ दाखविल्याचा आरोप अ‍ॅड. रवाणी यांनी केला आहे. नदीमला तर बेदम मारहाण केल्याने पोलिसांनी त्याला परस्पर १३ जुलै रोजी येथील सिद्धिविनायक या खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसानंतर परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून त्याला अन्य एका खासगी रुग्णालयात हलविले. मारहाण करून त्याच्याकडून जबदरदस्ती गुन्ह्याची कबुली करून घेतली. तसेच सर्व प्रकारचे बनावट पुरावे तयार केले. त्यामुळे १३ ते १७ जुलै दरम्यान दोन्ही रु ग्णालय आणि १० ते १७ जुलैपर्यंतचे मानपाडा पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत, अशी मागणी आरोपीचा भाऊ इम्तियाज याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, मानवी हक्क आयोग, पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. निर्दोष संशयितांना यात नाहक गोवल्याने आपण यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही रवानी यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.............................पोलिसांनी यात दोन महिन्यांनी घटनास्थळावरून चॉकलेटचे रॅपर, गवत असे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी सुरुवातीला इम्तीयाज, अरमान, एहसान, नदीम आणि इहतसान या पाच भावांना १० जुलै रोजी ताब्यात घेतले. नंतर एहसान आणि नदीम या दोघांना अटक १७ जुलै रोजी अटक केली. यातील इहतसान याला त्याच दिवशी सोडले. तर इम्तियाज आणि अरमान यांना १६ जुलै रोजी चौकशीनंतर सोडण्यात आले. तोपर्यत यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप रवानी यांनी केला.. शिवाय, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बोलण्यासाठी संशयितांपैकी अरमान (१६) याला एकाने दोन हजार तर अन्य एका पोलिसाने एक असे तीन हजार रुपये दिल्याचाही आरोप आहे. 

‘‘आरोपी आपल्या बचावासाठी असे खोटे आरोप करीत असतात. त्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्याची कबूलीही दिली आहे. यात साक्षीदार आणि पुरावेही मिळाले आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याने अधिक भाष्य करणार नाही. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप असेल तर आरोपींनी पहिल्याच दिवशी सांगणे अपेक्षित होते.’’गजानन काब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMurderखून