ठाणे : रेल्वेस्थानकात दिवसेंदिवस वाढ प्रवासी लोड त्यातच त्यांच्या सुरक्षितेच्या प्रश्न डोळ्यासमोर ठेवून स्थानकात आणखी ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार वाढण्याची मागणी केली असून ते लवकरच बसवण्यात येतील, असा विश्वास ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी (आरपीएफ) वर्तवला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या २०७ इतकी होणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात दहा फलाट आहेत. तसेच या स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. स्थानकात असलेले १५७ सीसीटिव्ही कॅमेरे सुरक्षितेच्या दृष्टीने कमी पडत आहेत. त्यातूनच आणखी ५० सीसीटिव्ही कॅमेºयांची मागणी ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांक डून मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. बसवण्यात येणारे हे कॅमेरे अत्याधुनिक असावेत, असेही म्हटले आहे.या बाबत दुजोरा देऊन ते लवकरच लागतील. या ५० कॅमेºयांमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही कॅमेºयांची संख्या २०७ वर जाणार आहे. तसेच बसवण्यात येणारे कॅ मेरे अत्याधुनिक असतील. - राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरपीएफ, ठाणे.