शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

वाझेंच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या ताब्यात, इनोव्हा, स्कॉर्पिओ कार ठाण्यात आल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 3:16 AM

मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली.

जितेंद्र कालेकर -

ठाणे : एनआयएने वाझे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील ‘सीसीटीव्ही’ फुटेज `साकेत` सोसायटीकडून  घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. फुटेजबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच एनआयए किंवा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांना आपण संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती सोसायटीने ‘लोकमत’ला दिली. (CCTV footage of vaze's society in NIA possession)

मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली. त्यामुळे वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. हिरेन यांची स्कॉर्पिओ व मुंबई पोलिसांची इनोव्हा ही वाझे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आली होती का, याचा तपास एनआयए करीत असून त्याकरिता त्यांना साकेत सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत. तसेच कांदिवलीच्या तावडे साहेबांचा फोन आल्याचे सांगून घराबाहेर पडलेले मनसुख हिरेन हे वाझेंना भेटायला त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आले होते का, याचा उलगडा होण्याकरिताही हे फुटेज एनआयएला हवे आहे.  काही वाहिन्यांवर ती इनोव्हा ठाण्याच्या दिशेने जात असल्याचे फुटेज दाखवले जात आहेत. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एटीएसच्या मुंबई पथकाकडून सुरू आहे. एटीएसच्या ठाणे पथकाने वाझे यांचे निवासस्थान असलेल्या साकेत कॉम्प्लेक्समधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण यापूर्वी घेतले होते. गेल्या दोन दिवसांत साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्हींची पडताळणी एनआयएने केली. 

सोसायटीचे एटीएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य राहील, पोलीस किंवा प्रसारमाध्यमांंनीही आम्हाला सहकार्य करावे, असे या सोसायटीचे अध्यक्ष हेमंत हजारे यांनी सांगितले. सध्या साकेत सोसायटीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस केली जात असून नोंद ठेवण्यात येत आहे. 

एटीएसने केली तीन तास चौकशीरविवारी सुटीचा दिवस वगळता सलग चौथ्या दिवशी एटीएसने सोमवारी पुन्हा मनसुख हिरेन यांचे भाऊ विनोद आणि मुलगा मित यांची दोन ते तीन तास चौकशी केली. या चौकशीतील माहिती मात्र देता येणार नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारची भूमिका चुकीची - रामदास आठवले- स्फाेटक कार प्रकरणात सुरुवातीपासूनच राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने संशयास्पद असणाऱ्या सचिन वाझेंना पाठीशी घालण्याची चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी सुरुवातीपासून वाझेंना अटक करण्याची मागणी केली हाेती. मात्र राज्य सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. - असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात, असे आठवले म्हणाले. वाझे यांची भूमिका संशयास्पद असूनही महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव होता, असेही आठवले म्हणाले. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाcctvसीसीटीव्ही