ठाणे : संपूर्ण ठाणे शहर हे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असतानाच आता महापालिका मुख्यालय इमारतीमधील अधिकारी आणि पदाधिकाºयांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला जोडण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला आहे. येत्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. या नियंत्रण कक्षामुळे अधिकारी आणि पदाधिकाºयांच्या हालचाली टिपल्या जाणार असल्याने महासभा या प्रस्तावाला मंजुरी देणार का, हा सवाल आहे.ठाणे शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. आतापर्यंत १४० कॅमेरे बसवले असून टप्प्याटप्प्याने त्यांचे काम सुरू आहे. ठाणे पालिका मुख्यालयात पालिका अधिकारी आणि पदाधिकाºयांची कार्यालये आहेत. तेथे अनेक जण विविध कामांसाठी येत असतात. मात्र, अधिकाºयांच्या कार्यालयांमध्ये काही वेळेस आंदोलनांचे प्रकार घडतात. त्यामुळे मुख्यालय इमारतीमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून प्रवेशद्वारापासून ते कार्यालयांपर्यंत सुरक्षारक्षकांचे कवच आहे. कार्यालय परिसरात १०० सीसी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.- या कॅमेºयांचे एकत्र चित्रीकरण संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांकडे देण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष नाही.त्यामुळे या सर्वच कॅमेºयांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. तो महासभेने मंजूर केला तर सर्व कॅमेरांद्वारे केले जाणारे चित्रिकरण एकत्र पाहता येईल.
ठाण्यात अधिका-यांवर सीसीटीव्हीचा वॉच, सुरक्षा विभागाचा प्रस्ताव, लक्ष लागले महासभेच्या मंजुरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:03 AM