ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सायबरतज्ज्ञ अजिंक्य नागरगोजेने कारच्या मोबदल्यात सीडीआर पुरवल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. अजिंक्य आणि त्याच्यासोबत अटक केलेल्या आणखी एका आरोपीला न्यायालयाने गुरुवार, १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकणाºया टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ने गत आठवड्यात केला. बुधवारी या प्रकरणी सायबरतज्ज्ञ अजिंक्य नागरगोजे आणि जसप्रीतसिंग मारवाह यांना अटक करण्यात आली.अजिंक्यने यवतमाळ पोलिसांचे शासकीय संकेतस्थळ त्यानेच तयार केले होते. यवतमाळ पोलिसांच्या संकेतस्थळावर ‘डेव्हलपर’ म्हणून आजही अजिंक्यचे नाव मुखपृष्ठावर झळकत आहे. ते तयार करण्याच्या निमित्ताने त्याला यवतमाळ पोलिसांची संगणकीय प्रणाली हाताळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांचा कार्यालयीन ई-मेल आयडी दैनंदिन कामासाठी तेथील लिपिक वापरत असता नात्याने त्याचा पासवर्ड चोरून बघितला होता.अजिंक्यसोबत अटक केलेला जसप्रीतसिंग मारवाह हा एका मोबाइल कंपनीने आउटसोर्सिंगसाठी नेमलेल्या कंपनीमध्ये नोकरीला होता. त्याने ३४ पोस्टपेड मोबाइल फोनचा तपशील आरोपींना विकला़>पोलीस उपअधीक्षकाची परीक्षा उत्तीर्णआरोपी अजिंक्य नागरगोजे हा उच्चशिक्षित आहे. त्याने कायद्याची पदवी घेतली असून सायबर सुरक्षेची पदविकाही प्राप्त केली आहे. ‘एथिकल हॅकिंग’ची आॅनलाइन परीक्षादेखील त्याने उत्तीर्ण केली आहे. पोलीस उपअधीक्षकपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली पूर्वपरीक्षा त्याने उत्तीर्ण केली असून या पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे.पुढाºयांकडून आरोपींचा वापरपोलिसांनी अटक केलेल्या गुप्तहेरांचा वापर काही मोठ्या नेत्यांनी तसेच बॉलिवूडच्या दिग्गजांनी केल्याची चर्चा या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रंगली आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासातून अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. इत:पर बेकायदेशीरपणे मिळवलेले सीडीआर हाच तपासाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिली.
कारच्या मोबदल्यात पुरवले सीडीआर,उच्चशिक्षित आरोपीची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 4:59 AM