लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - १ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला . प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने आपल्या मित्र मैत्रीणी सोबत ,हा दिवस साजरा करतात. कोरोना काळात सर्व शाळा कॉलेज बंद असल्याने युवकांना हा दिवस उत्साहात साजरा करता आला नाही. तरी मीरा - भाईंदर मधील पॉस अँड विंग्स या संस्थेने 'फ्रेंडशिप डे' भटक्या श्वानां सोबत साजरा केला. रविवारी सकाळी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अंधारात चमकेल असे रेडियम पट्टे बांधण्यात आले. रात्री हे पट्टे चमकतील जेणे करून श्वानांच्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या शिवाय जख्मी झालेल्या प्राण्यावर उपचार करण्यात आले.