शाम धुमाळ, कसारा: भारतीय संस्कृतीची जोपासना आणि सण-उत्सवातील जिवंतपणा जागृत ठेवण्यासाठी कसाऱ्यातील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कृष्णजन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्ण जन्माचे स्वागत करण्यासाठी शात्रशुद्ध पद्धतीने रात्री साडेबारा बजता श्री कृष्णाचे पूजन करून श्री कृष्णाजन्माष्टमी साजरी करण्यात आली. श्रावण महिन्यात मोट्या प्रमाणात सण-उत्सव साजरे केले जातात. कृष्णजन्माष्टमी श्रावणातील सर्वात मोठा सण आहे. भारतीय सण-परंपरा जोपासण्यासाठी श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कृष्ण जन्माष्टमी उत्सवातील उत्साह द्विगुणित करण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी करून दर्शनासाठी झुंबड जमवली होती. कृष्णाजन्माष्टमी निमित्ताने भजन-कीर्तनाचा सूर मंदिराच्या चारही दिशेने दरवळत होता. श्री कृष्ण जन्माचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी भक्तांची मंदिरात मोठी गर्दी पहावयास मिळत होती. त्या नंतर श्री हनुमान सेवा मंडळा चे अध्यक्ष जयवतं घाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी दहीहंडी उत्सव सुरु करण्यात आला हनुमान सेवा मंडळाच्या गोविंदा पथकाने सकाळी 9 वाजता मानाची हंडी फोडून सुरुवात केली.
श्री हनुमान सेवा मंडळाच्या गोविंदा पथकाने कसारा गावातील 20 हून अधिक हंड्या फोधून परंपरा जपली.दरम्यान श्री हनुमान सेवा मंडळाच्या गोविंदा पथकाचे गेली 30 वर्षा पासून एक वैशिष्ठ आहे 4 ते 6 थर लावून हंडी फोडणाऱ्या हे गोविंदा पथक कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता केवळ हिंदू संस्कृती जपण्यासाठी बाळ गोपाळा सह हा उत्सव साजरा करताना मोठ मोठ्या दही हंडी फोडतात.
श्री हनुमान सेवा मंडळं ,देऊळवाडी हे कसारा पंचकोशीतील एक समाजिक ,धार्मिक,शैक्षिणिक कार्य करणारी समाजिक संस्था आहे आम्ही व आमचे गोविंदा पथक जेव्हा गावातील 20 हून अधिक दही हंडी फोडण्यासाठी टाळ, मृदूगाच्या तालावर जात असते तेव्हा आम्ही कोणा कडून कोणतंही आर्थिक अपेक्षा ठेवत नाही.केवळ हिंदू संस्कृती,परमपरा ,संस्कृती टिकावी यासाठी आम्ही तत्पर असतो.- जयवंत घाग, अध्यक्ष, श्री हनुमान सेवा मंडळ, कसारा