शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
3
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
4
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
5
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
6
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
7
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
8
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
9
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
10
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
11
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
12
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
13
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
14
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
15
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
16
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
17
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
18
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
19
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
20
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

‘कार कार्निवल’चा जल्लोष

By admin | Published: August 20, 2016 4:41 AM

‘सॉलिटेर इव्हेंटस’ने ‘लोकमत’च्या सहकार्याने कोरम मॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कार कार्निव्हल’चे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांच्या हस्ते शुक्रवारी

ठाणे : ‘सॉलिटेर इव्हेंटस’ने ‘लोकमत’च्या सहकार्याने कोरम मॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कार कार्निव्हल’चे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी उदघाटन झाले. यानिमित्त ‘माय ड्रीम कार’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिस वितरणही करण्यात आले.यावेळी ‘सॉलिटेर इव्हेंटस’चे संचालक गिरीष जैन, ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, सरस्वती इंग्लिश माध्यमिक शाळा (राबोडी)च्या अध्यक्षा मीरा कोरडे, ‘लोकमत’चे सहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेट, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आदी उपस्थित होते. ‘काहीतरी कर ठाणेकर’ या ‘लोकमत’च्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेतली. पालवे यांनी चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांनी आपल्या चित्रांमार्फत सुचविलेल्या रेन वॉटर हार्व्हेस्टिंग कार, सौर उर्जेवरील कार अशा वेगवेगळया संकल्पनांचेही स्वागत केले. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकते. सिट बेल्ट लावणे, हेल्मेट परिधान करणे, रस्ता ओलांडतांना घ्यावयाची काळजी अशा छोटया छोटया गोष्टींमधूनही अपघातांना आळा बसू शकतो, असा सल्लाही पालवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सरस्वती स्कूलचा पार्थ खेडेकर (सहावी, अ), आदित्य वावटकर (५ वी, अ) आणि अंतरिक्ष मानवडकर (५ वी, ब) या तिघांना चित्रकलेतील अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. विजय शुक्ला आणि मीरा कोर्डे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.‘कोरम मॉल’ आणि ‘लोकमत’ पार्टनर असलेला हा ‘कार कार्निव्हल’ १९ ते २१ आॅगस्टपर्यत सुरु राहणार आहे. याठिकाणी आॅडी, बीएमडब्लू, मर्सिडीज, नेक्सा, निसान,या मोटारींचे आणि हर्ले डेव्हीडसन या दुचाकींचे प्रदर्शन भरविल्याचे जैन यांनी यावेळी सांगितले. सागर अहेरवाल आणि तन्वी सिन्हा यांनी सूत्रसंचालन केले.